Site icon InMarathi

हे व्हिजिटिंग कार्ड देतंय हजारोंना प्रेरणा, नक्की वाचा, मित्र-मैत्रिणीलाही सांगा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लग्न पत्रिका, फॅन्सी विझिटिंग कार्डच्या माध्यमातून आपलं स्टेटस, आपले शौक अनेकजण जाहीर करत असतात. अव्याहतपणे पैसा त्यात ओतला जातो, पण त्याचा तसा उपयोग शून्यच असतो.

“त्यांचा पैसा, त्यांचे शौक, आपल्याला त्याच काय?” असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो, पण या गोष्टीना छेद देणारी माणसं  पण आपल्याच आजूबाजूला असतात.

लहान लहान पुस्तकांच्या शेवटच्या कोऱ्या पानावर लग्नाचे निमंत्रण देणाऱ्या जोडप्याची एक पत्रिका महाराष्ट्रात खूप फिरत होती. जिल्हा प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या त्या नवरदेवाची ती कल्पक युक्ती होती.

यामुळे निमंत्रण तर गेलंच, शिवाय इतरांना वाचायला पुस्तक सुद्धा उपलब्ध झाली.

अशीच मागे एक लग्न पत्रिका पाहिली होती. जी चक्क हात रुमालावर छापली होती आणि त्यावरची प्रिंट ही एका धुलाईत निघून जाईल अशी होती.

 

 

एकंदरीत पत्रिकेचं काम झालं की धुवून त्याचा रुमाल म्हणून वापर करता येईल.आणि विशेष म्हणजे त्या मंडळींनी घरात जितके सदस्य तेवढ्या या पत्रिका वाटल्या होत्या.

सांगायचं तात्पर्य हेच की, डोकं, कल्पकता ही देताना देवाने सगळ्यांना समान दिली आहे. त्याचा वापर कोण कशाप्रकारे करत याची ही दोन उदाहरण.

कोणी आत्मकेंद्रित राहून वागतं, तर कोण समाजोपयोगी पद्धतीने वागतं. आता ही ज्याची त्याची सद्सद्विवेकबुद्धी!

आज आपण भेटणार आहोत अशाच एका समाजोपयोगी पद्धतीने पर्यावरण पूरक जीवन जगणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याशी ज्याच्या एका छोट्याश्या कृतीने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

हे आहेत परवीन कासवान, २०१६ बॅचचे भारतीय वन सेवेचे (आयएफएस) अधिकारी!

 

 

भारतीय वन सेवेत सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा थेट संबंध येतो तो वन आणि वन्य जीवांशी. त्यांची देखरेख, त्यांचं संगोपन हे यांच्या अखत्यारीत येते.

परवीन कासवान यांची विशेषता आहे त्यांचं विझिटिंग कार्ड!

विचार करा आपण एखादं विझिटिंग कार्ड घेतलं, की जास्तीस जास्त काय करतो? अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे असेल तर पाकिटात ठेवतो, त्यावरचा नंबर आणि पत्ता सेव्ह करून कुठे तरी अडगळीत टाकून देतो. अगदीच कामाचं नसेल, तर कचऱ्याच्या पेटीत.

लोकांच्या हाच स्वभाव लक्षात घेऊन परवीन कासवान यांनी असं विझिटिंग कार्ड तयार केलं आहे, जे मातीत पुरल्यानंतर त्यातून औषधी झुडूप किंवा एखादं रोपटं येईल.

 

 

कासवान यांनी आपलं हे विझिटिंग कार्ड लोकांसाठी ट्विटर वर शेअर केलं आणि या प्रकारचे कार्ड कसे बनवू शकतो याची इत्यंभूत माहिती सुद्धा शेअर केली.

 

 

कासवान यांच्या या कृत्याने लोकांनी त्यांची स्तुती केली आहे. त्यांच्या या कृतीने अनेकांना अशी पर्यावरण पूरक कार्य करण्यासाठी उद्युक्त केले आहे.

“माझ्या ऑफिस मध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला ही गोष्ट मिळणार आहे. हे कार्ड मातीत पुरल्यानंतर यातून सुंदर असे तुळशीचे रोपटं उगवेल.” असं ते म्हणाले.

आपल्या या विझिटिंग कार्डच्या कल्पनेबद्दल सांगताना कासवान म्हणतात, “या कार्डचा हेतू हा फक्त संपर्कापुरता नसून इतरांना हे ‘कार्ड मातीत लावा’ हा आहे.”

परवीन कासवान यांच्या या पोस्टला उत्तम प्रतिसाद नेटिझन्सनी दिला.

प्रतिक्रिया देताना बर्‍याच व्यावसायिकांनी सांगितले, की ते पर्यावरणास अनुकूल अशी ही कल्पना आत्मसात करतील.

 

 

तर काहींनी असे म्हटले, की वाढदिवस आणि लग्नाचे कार्ड हे असेच फेकून दिले जातात, या विझिटिंग कार्ड सारखे ते कार्ड छापले आणि नंतर फेकून जरी दिले, तरी त्यातून रोपंच बाहेर येईल.

तुम्हीही असं कार्ड छापून घेऊ शकता, त्यासाठी फक्त गुगलवर सर्च केलंत तर तुम्हाला अनेक साइट्स आणि त्यांचे नंबर मिळतील. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही घरबसल्या असं कार्ड बनवून घेऊ शकता.

परवीन कासवान यांचं हे पर्यावरण पूरक वागणे काही आजचं नाही.

मागे एका आई हत्तींणीला आणि तिच्या लहान पिल्लाला रस्ता ओलांडताना होणाऱ्या त्रासाचा फोटो त्यांनी शेअर केला होता. वन्य परिसरात मानवाचा होणार अतिरेकी वावर वन्य जीवांना कसा त्रासदायक आहे हे तेथे ते सांगू इच्छित होते.

वन अधिकारी असल्याने त्यांचं सोशल मीडिया हे वन आणि वन्यप्राणी यांनीच भरलेले दिसेल. एकूणच, आपल्या कामाला आपलं पॅशन मानून काम करत असलेल्या परवीन कासवान यांना सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version