या IPL मध्ये क्रिकेट फॅन्सना उणीव भासणार असे ७ दिग्गज खेळाडू कोण ते वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता यावर्षी १३ वी आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब राष्ट्रात आयोजित केले गेले आहे.
काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेल्या या स्पर्धेसाठी सर्व टीम नेट मध्ये घाम गाळताना दिसत आहेत.
रोहित शर्मा, धोनी, कोहली, रहाणे सगळ्यांच्या नेट प्रॅक्टिसचे व्हिडीओ आज सोशल मिडियावर दिसत आहेत.
एकूणच सहा महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेटच्या या उत्सवात चाहत्यांना छक्के-चौक्यांसोबत विकेट पडताना सुद्धा पाहायला मिळतील.
या आनंदा सोबत आनंदात विरजण घालायचे काम सुद्धा पार पाडले गेले असे आपण म्हणूं शकतो. आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या तशा अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली.
संघांचे मुख्य खेळाडू असल्या कारणाने त्या त्या संघांनी तयार केलेल्या स्ट्रॅटेजी त्यांना पुन्हा तयार करावे लागणार शिवाय लोकप्रिय खेळाडू असल्याने चाहत्यांना त्यांना स्पर्धेतील परफॉर्मन्सला मुकावे लागणार आहे.
एकूणच गोड कडू स्वरूपात या आयपीएल ला सुरवात होणार असं आपण म्हणू शकतो. एकूण सात खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
मुंबई, कोलकाता, बंगळूर यांचा प्रत्येकी एक खेळाडू तर दिल्ली, चेन्नई यांच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
तर बघूया कोण कोणत्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
१. लसीथ मलिंगा :
आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्यातील अंतिम चेंडू वरचा मलिंगाचा तो यॉर्कर कोण विसरेल?
अनुभव आणि वेग यांचं संतुलित उदाहरण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या भात्यातला वेगवान बाण म्हणजेच लसीथ मलिंगा.
आयपीएल मध्ये कमी सामने खेळून सुद्धा सर्वाधिक विकेट घेणार खेळाडू म्हणजे मलिंगा. वर एवढी विशेषण का लावली ती यासाठीच.
वयक्तिक कारणांचा दाखला देऊन मलिंगा स्पर्धेत भाग घेणार नाही असं म्हटलं जातं. परंतु वडिलांचे आजारपण हे त्याचे न खेळण्याचे मुख्य कारण आहे.
डेथ ओव्हर मधली त्याची स्पेशालिटी पाहता मुंबईला बरच नुकसान होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन मलिंगाला रिप्लेस करेल.
२. जेसन रॉय :
व्यस्त शेड्युल मधून वेळ काढणे शक्य नसल्याचे सांगून ब्रिटिश ओपनर जेसन रॉयने स्पर्धा खेळण्यास नकार दिला.
त्यामुळे यावेळेस दिल्लीची तुफानी ओपनिंग कुठे तरी मिस होण्याची शक्यता आहे. दिल्लीने १.५ करोडची बोली लावून त्याला आपल्या पदरात पाडून घेतले होते.
जेसन रॉयला ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर डॅनियल सॅम्स रिप्लेस करेल.
३. केन रिचर्डसन :
बंगळूरने चार करोड किंमत मोजून हा ऑस्ट्रेलियन पेसर आपल्या खेम्यात आणला होता.
२९ वर्षीय केन पहिल्यांदाच वडील होणार आहे. त्यामुळे पूर्णवेळ तो आपल्या पत्नीसोबत राहण्याचे पसंद करणार आहे. त्यामुळे यावेळेस आयपीएल मधून त्याने माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचाचं गोलंदाज ऍडम झम्पा त्याला रिप्लेस करेल.
४. हरभजन सिंग :
मुंबई इंडियन्सच्या खेम्यातून चेन्नई सुपरकिंग्जच्या तंबू मध्ये गेलेल्या हरभजनने तिथे सुद्धा आपलं नाणं खणखणीत वाजवले आहे.
चेन्नईचा फुल्ल टाईम ऑफ स्पिनर असलेल्या भज्जीची अनुपस्थिती म्हणजे लेफ्ट हँडर्स बॅट्समनना क्रिस मधून बाहेर आणून विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची अनुपस्थिती.
चाळीस वर्षीय हरभजनने ट्वीट करून आपलं आयपीएल खेळत नसल्याचे जाहीर केले होते.
अधिकृतपणे हरभजनला कोण रिप्लेस करेल हे जाहीर झालेले नाही. तरी जलाज सक्सेना, हनुमा विहिरी आणि युसूफ पठाण यापैकी एक त्याची जागा चेन्नईच्या संघात घेईल.
५. हॅरी गर्ने :
कोलकाताने ७५ लाखाच्या बेसिक बेस किमतीवर आपल्या बाजूला घेतलेला ब्रिटिश खेळाडू.
२०१९च्या सिझन मध्ये आपल्या बॉलिंगच्या बळावर काही खास जादू न करू शकलेल्या हॅरी या खेळाडू कडून या वर्षी चमकदार कामगिरीची अपेक्षा होती.
परंतु आपल्या खांद्याच्या दुखापतीमुळे यावर्षी त्याने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकात्याने अजून त्याचा रिप्लेसमेंट जाहीर केलेला नाही.
६. ख्रिस वोक्स :
सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड मध्ये चाललेल्या बाय लॅटरल सिरीज मध्ये वोक्स चमकदार कामगिरी करत आहे.
परंतु त्याची पत्नी आजारी असल्या कारणाने महिनाभर तिच्या पासून लांब राहणे शक्य नाही सांगून वोक्सने आयपीएलला रामराम ठोकला.
आणि राष्ट्रीय संघाकडून खेळणे पहिले प्राधान्य असल्या कारणाने आयपीएल पेक्षा देशाकडून खेळणे जास्त पसंत असल्याचे त्याने सांगितले.
दिल्ली कडून खेळणाऱ्या ख्रिस वोक्सला दक्षिण आफ्रिकी गोलंदाज एनरीच नोर्टजे रिप्लेस करेल.
७.सुरेश रैना :
सुरेश रैना आणि आयपीएल म्हणजे एक वेगळंच समीकरण आहे. मिस्टर आयपीएल म्हणून रैनाची ख्याती अशीच नाही.
आयपीएलच्या प्रत्येक सिझन मध्ये ४००+ धावा असो, कामचलाऊ बॉलिंगच्या आधारावर विकेट घेणे असो किंवा चपळ फिल्डिंगने अशक्यप्राय कॅच घेणे किंवा २-३ धावा अडवणे असो सर्व बाबींमध्ये रैना फिट बसतो.
चेन्नईचे आतापर्यंतचे सगळे प्ले ऑफ खेळणे असो वा विजेतेपद सगळ्यामध्ये मोलाचा वाटा आहे तो रैनाचा.
आयपीएल मधून सगळ्यात आधी माघार घेतली ती रैनाने. धोनी सोबत अनबन, हॉटेल रूम वरून नाराजी सारख्या बातम्या पसरल्या तर जम्मू काश्मीर स्थित नातेवाईकांवर झालेला हल्ला असे नानाविध कारण पुढे आली.
शेवटी वयक्तिक कारण देऊन रैनाने सगळ्या वादाला पूर्णविराम दिलं.
रैनाची जागा तसं बघायला गेलो तर कोणीच घेऊ शकत नाही. पण नव्याने आलेला ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू सारखे खेळाडू रैनाची जागा घ्यायला संघात उपलब्ध आहेत.
तर, मलिंगा-हरभजन यांची जबरदस्त गोलंदाजी आणि रॉय, रैना यांची फलंदाजी या आयपीएल मध्ये नसेल आणि याची पोकळी या स्पर्धेत नक्की दिसून येईल.
बाकी १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या जत्रेत काय नवनवीन विक्रम आणि पराक्रम घडून येतील हे तेव्हाच बघणे सोयीस्कर राहील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.