' तुमचा हरवलेला DSLR कॅमेरा शोधण्याचे महत्वाचे ३ उपाय जाणून घ्या – InMarathi

तुमचा हरवलेला DSLR कॅमेरा शोधण्याचे महत्वाचे ३ उपाय जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रवास किंवा भटकंती आवडणार नाही असा माणूस विरळाच. एकदा का निघण्याचा दिवस ठरला की उत्साह नुसता ओसंडून वाहत असतो.

बॅग भरताना काय काय न्यायचं ह्यात पहिल्या क्रमांकावर वर्णी लागते कॅमेराची. होय, कुठेही जा कॅमेरा हवाच. हल्ली प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असतोच म्हणा पण तरी कॅमेराची बातच न्यारी.

 

ranbir kapoor inmarathi

 

मात्र कधी कधी कॅमेरा वापरण्याची सवय नसल्याने म्हणा किंवा धांदल उडाल्याने म्हणा आपला हा कॅमेरा आपल्या हातून हरवला तर? किंवा कोणी आपल्या नकळत लांबवला तर?

काय करायचं? नाही नाही, अगदी डोक्याला हात लावून बसायची काहीही गरज नाही.

आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की जर अनावधानाने तुमचा कमेरा हरवला किंवा कोणी लांबवला अथवा कोण्या इतर प्रकारे गहाळ झालाच तर तुम्ही कशाप्रकारे तो परत मिळवू शकता.

पहिली पद्धत – स्मार्टली ट्रॅक करा :

तुमचा डिजिटल कॅमेरा हरवल्यास त्याचा सिरीयल नंबर शोधा, गॅजेट ट्रॅक किंवा स्टोलन कमेरा फाईंडर सारख्या साईट्स तुमचा कमेरा शोधायला मदत करू शकतात.

त्यासाठी ते तुमच्या सिरीजच्या कॅमेराने काढलेले फोटो फ्लिकर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर अपलोड झालेल्या फोटोशी कॅम्पेअर करून बघतात.

त्यावरून ते तुमच्याच कॅमेऱ्याने काढले गेले आहेत का ह्याचा शोध घेतला जातो. हा नंबर तुम्हाला त्या बॉक्सवर मिळेल ज्यात कॅमेरा पॅक होऊन आलेला असतो.

 

track your camera inmarathi
wikihow.com

 

तुमचा जो कॅमेरा गहाळ झालाय त्यावरूनच काढलेला फोटो, कॅमेरा ट्रॅक करणाऱ्या वेबसाईट वर अपलोड करा.

त्यावरून स्टोलन कॅमेरा फाईंडर सारख्या साईट्स, जुन्या फोटोंची तुलना इंटरनेटवर अपलोड झालेल्या फोटोच्या मेटाडेटाशी करतात.

त्यावरून जर कोणी तुमच्या कॅमेऱ्याने काढलेले फोटो इंटरनेटवर, सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करत असेल तर तो सहज पकडला जाऊ शकतो.

Cameratrace.com ही आणखी अशी एक साईट आहे जी तुम्हाला ह्यासाठी मदत करू शकते. तुम्ही अशी वापरलेली गॅजेट्स विकणाऱ्या छोट्या दुकानदारांकडे चौकशी करू शकता.

ज्या भागात तुमचा कॅमेरा हरवला असेल त्या भागातल्या अशा दुकानदारांकडे तुमच्या कमेऱ्याशी जुळणारा तपशील देऊन विचारपूस करा.

त्यांच्याकडे असलेले कॅमेरे बघून, तुमचा कॅमेरा त्यात आहे का त्याची खात्री करा, दुकान दाराला असा कॅमेरा विकायला आल्यास कळवण्याची विनंती करा.

मात्र हे करत असताना त्यांना कळता कामा नये की तुम्ही तुमचा चोरी गेलेला कॅमेरा शोधता आहात ते, खरेदीचा बहाणा केलेला उत्तम म्हणजे ते तुम्हाला नीट सहकार्य करतील.

 

camera find inmarathi
wikihow.com

 

इंटरनेटवर ई-बे किंवा क्रेगलिस्ट सारख्या शॉपिंग साईटवर तुम्ही आपल्या कॅमेराचा नंबर आणि इतर जुळणारे तपशील टाकून कॅमेरा शोधण्याचा प्रयत्न करा.

म्हणजे जर कोणी तुमचा कॅमेरा चोरून तो ऑनलाईन विकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची माहिती ताबडतोब तुम्हाला मिळेल आणि तुम्ही योग्य ती कारवाई करू शकाल.

हे करताना कॅमेराच्या तांत्रिक तापशिलांसोबतच जिथे कॅमेरा हरवलाय त्या लोकेशनचे फिल्टर लावायला विसरू नका, जेणेकरून तुमचे काम आणखी सोपे होईल.

दुसरी पद्धत – पोलिसांची मदत घ्या

अशावेळी जवळचे ठाणे शोधून पोलीसांत तक्रार नोंदवा, त्यांच्याशी बोलताना त्यांना स्पष्ट सांगा की, नकळत तुमचा कॅमेरा चोरीला गेलाय आणि तुम्हाला त्याची तक्रार नोंदवायची आहे.

प्रत्येक ठिकाणच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची आणि शोध घेण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.

 

police report inmarathi

 

काही ठिकाणी ऑनलाईन तपास केला जातो, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यावर भर दिला जातो.

सुदैवाने तुम्हाला तुमचा कॅमेरा सापडला तर ह्याबद्दल पोलिसांनी कळवायला विसरू नका.

जर तुम्हाला कॅमेरा ऑनलाईन साईटवर किंवा एखाद्या विक्रेत्याकडे आढळला असेल तर एकट्याने तो मिळविण्याचा प्रयत्न करू नका, पोलिसांची मदत घ्या.

एकट्याने असे धाडस करणे तुमच्या जीवावर बेतू शकते.

तुम्हाला कॅमेरा जिथे सापडला तिथली तपशीलवार माहिती पोलिसांना द्या, त्यावर पोलीस ज्याप्रकारे कारवाई करायला सांगतील तसे करा, म्हणजे कॅमेरा परत मिळवण्यात कसलीही अडचण येणार नाही.

तिसरी पद्धत – हरवण्याआधीच काळजी घ्या

आपल्या कॅमेऱ्यावर आपले नाव, आपला पत्ता आणि संपर्क क्रमांक चिकटवून ठेवा.

म्हणजे कधी अनावधानाने कॅमेरा गहाळ झाला आणि कोणाला सापडला तर त्याला तो तुमच्यापर्यंत सहजतेने पाठवता येईल किंवा तुम्हाला त्याबद्दल कळवता येईल.

तुमच्या कॅमेऱ्याच्या बॅगमध्ये जीपीएस ट्रॅकर लावून ठेवा. हे ट्रॅकर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे अगदी लहान आकाराचे जीपीएस ट्रॅकर ऑनलाईन उपलब्ध आहेत.

तुम्हाला रुचेल ते ट्रॅकर डिवाईस घेऊन ते तुम्ही तुमच्या कॅमेराला बसवून घ्या जेणेकरून अशी वेळ आलीच तर तुम्ही सहज आपल्या फोनच्या मदतीने आपला कॅमेरा ट्रॅक करून परत मिळवू शकता.

तुमची तपशीलवार माहिती असलेल्या नोट चा फोटो तुमच्या कॅमेरात काढून घ्या शिवाय ती नोट धरलेला तुमचा स्वतःचाही फोटो कॅमेरात असू द्या.

 

note inmarathi
wikihow.com

 

म्हणजे जर कोणाला कॅमेरा सापडला आणि त्याने फोटो चेक केले ते त्याला तुमची ही माहिती मिळेल आणि तो तुम्हाला सुरक्षितपणे कॅमेरा परत करू शकेल.

कॅमेरावर ओळखू येईल अशी खूण करून ठेवा, एखाद्या कोपऱ्यात स्टिकर लावा किंवा मार्कर ने पक्की खूण करा म्हणजे कोणाकडे सेम कॅमेरा दिसल्यास तो तुमचा आहे हे तुम्हाला त्या खुणेवरून चट्कन ओळखता येईल.

ज्या ब्रॅंडचा कॅमेरा खरेदी केला असेल त्या ब्रँडच्या अधिकृत साईटवर जाऊन तुमच्या डिवाईस ची नोंदणी करा, त्यासाठी आवश्यक त्या सूचना कमेऱ्यासोबत येणाऱ्या मॅन्युअल मध्ये दिलेल्या असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?