' रेल्वेच्या डब्यांवरच्या या खास क्रमांकाचे गुपित तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल! – InMarathi

रेल्वेच्या डब्यांवरच्या या खास क्रमांकाचे गुपित तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रेल्वेने प्रवास करताना तुमचे रेल्वे डब्ब्यांवर असणाऱ्या क्रमांकाकडे तुमचे कधीना कधी लक्ष गेले असेलच आणि तुमच्या हे देखील लक्षात आले असेल की प्रत्येक रेल्वे डब्ब्यावर वेगवेगळे क्रमांक असतात. आता क्रमांकामागे काय अर्थ लपलाय?

आता आपण जे छायाचित्र पाहतोय त्यावर आपल्याला ९८३३७ हा क्रमांक दिसतोय. हा क्रमांक त्या रेल्वे कोच (डबा) ची माहिती देतो ज्यावर हा नंबर लिहिलाय.

 

indian-railway-caoach InMarathi

 

पहिले दोन क्रमांक हे दर्शवतात की या या डब्ब्याची निर्मिती कधी केली गेली? आता वरच्या क्रमांकाकडे लक्ष दिल्यास आपल्या लक्षात येईल की त्याचे पाहिले दोन क्रमांक हे ९८ हे आहेत म्हणजे १९९८ रोजी हा डब्बा तयार करण्यात आला.

पण त्या शेवटच्या तीन क्रमांकांबद्दल काय? ते तीन क्रमांक काय दर्शवतात? त्यासाठी खाली दिलेली यादी पहा.

००१-०२५  : एसी फर्स्ट क्लास, NER (उत्तर पूर्व रेल्वे) मध्ये काही डब्बे हे २०००/२००१ सालापासून बनवण्यास सुरुवात झाली.
०२६-०५० : संयुक्त 1AC + AC-2T
०५१-१००  : 1AC
१०१-१५०  : AC-3T
१५१-२००  : CC (एसी चेअर कार)
२०१-४००  : SL (सेकंड क्लास स्लीपर)
४०१-६००  : GS ((जनरल सेकंड क्लास)
६०१-७००  : 2S (सेकंड क्लास सिटींग/ जनशताब्दी चेअर कार्स)
७०१-८००  : SLR
८०१ +        : पॅन्ट्री कार, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार, VPU इत्यादी.

आता वरच्या ९८३३७ क्रमांकामध्ये शेवटचे ३ क्रमांक आहेत- ३३७

हा क्रमांक २०१-४०० : SL (सेकंड क्लास स्लीपर) या श्रेणीमध्ये मोडतो. आता पूर्ण ९८३३७ या क्रमांकाचा अर्थ लावायचा झाल्यास- १९९८ साली तयार झालेला हा सेकंड क्लास स्लीपर क्लासचा ३७ वा डब्बा आहे.

 

indian-railway-caoach 1 InMarathi

 

अजूनही गोंधळलेले आहात? चला अजून एक उदाहरण घेऊ

समजा, रेल्वे डब्ब्यावर आपल्याला ०३२३० हा क्रमांक दिसतोय, तर या क्रमांकाचा अर्थ असा, की २००३ साली तयार झालेला हा सेकंड क्लास स्लीपर क्लास चा ३० वा डब्बा आहे.

काय कशी वाटली ह्या क्रमांकामागची गंमत???

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?