' राखेतून उठून स्वर्ग निर्माण करणाऱ्या “ह्या” शहराचा इतिहास तुम्ही वाचायलाच हवा! – InMarathi

राखेतून उठून स्वर्ग निर्माण करणाऱ्या “ह्या” शहराचा इतिहास तुम्ही वाचायलाच हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इटली या देशाचं नाव वाचलं की आपल्या समोर येतो तो त्यांनी पूर्ण जगाला दिलेला पिझ्झा, पास्ता. या दोन गोष्टींमुळे जगभरात किती लोकांच्या हाताला काम मिळालं याची काही गणनाच नाहीये.

किती तरी लोक हे पदार्थ तयार करण्याच्या व्यवसायात आहेत आणि किती तरी लोक हे या पदार्थांच्या डिलिव्हरी मध्ये आहेत.

मधल्या काळात कित्येक लोकांनी हे पदार्थ घरी कसे करायचे याचं सुद्धा स्किल शिकले आहेत.

इटली ही फक्त खाद्यपदार्थांसाठी नाही तर तिथल्या लोकांच्या नम्र वागण्यामुळे सुद्धा जगप्रसिद्ध आहे.

 

italy inmarathi

 

मध्यंतरी, कोरोना जेव्हा खूप वेगाने पसरत होता आणि लॉकडाऊन सुरू होता तेव्हा इटली चे नागरिक होते ज्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पोलीसांचे आणि डॉक्टरांचे अगदी शांतपणे आभार मानले होते.

आणि मग ही कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा प्रत्येक मोठ्या देशाने आमलात आणली. इटली हे पर्यटकांच्या आवडीच्या देशांपैकी एक आहे. आपण ते बऱ्याच सिनेमातून बघितलं आहेच.

माटेरा हे एक इटलीचं सांस्कृतिक वैभव आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. माटेरा शहराचा २०१९ मध्ये ‘युरोपियन कॅपिटल ऑफ कल्चर’ हा मान देऊन त्याचा गौरव करण्यात आला आहे.

हेच माटेरा एकेकाळी म्हणजे आजपासून ५० वर्षांपूर्वी इटली साठी तिथे असलेल्या गरिबी मुळे लाज वाटावं असं शहर होतं.

 

matera inmarathi

 

एक वेळ आली आणि त्यांचा उद्धार झाला आणि आज ते पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीच्या शहरांपैकी एक झालं आहे. कसा झाला हा बदल? जाणून घेऊयात.

रफालो रुगेरी हे एकेकाळी इटली चे महापौर होते. त्यांनी एका मुलाखतीत मान्य केलं होतं की,

“होय, आम्ही आमचा अपमानित ते वैभवशाली हा प्रवास पूर्ण केला आहे. १९५० मध्ये तत्कालीन पंतप्रधान अलसिड डी गस्पेरी यांना माटेरा यांना जनक्षोभाचा सामना करावा लागला होता.”

याची कारणं म्हणजे माटेरा च्या गरिबीमुळे, तिथे कधीच न झालेल्या विकास कामांमुळे, कोणत्याच घरात वीज, पाणी सारख्या सोयी नव्हत्या.

किती तरी लोकांचा मलेरिया मुळे जीव गेल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं. लोकांना हा त्रास सहन झाला नाही आणि त्यांनी विरोध दर्शवला होता.

जनतेच्या या आंदोलनाला प्रशासनाला प्रतिसाद द्यावाच लागला आणि त्यानंतर माटेरा या शहराचा अक्षरशः कायापालट झाला.

माटेरा शहराचा समावेश आता इटलीच्या Basilicata या भागात करण्यात आला आहे.

माटेरा हे शहर आता तिथे सुशोभित केलेल्या लेण्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे ज्या की आधी दुर्लक्षित होत्या. या लेण्यांमध्ये आता किती तरी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.

 

matera 2 inmarathi

 

आलेल्या प्रत्येक पर्यटकाला माटेरा म्हणजे एक सुखद अनुभव वाटला पाहिजे यासाठी Matera-Basilicata फौंडेशन चे डायरेक्टर सतत प्रयत्नशील असतात.

माटेरा या शहराची ओळख ही “Jerusalem of the West” या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे.

कारण, ज्याप्रमाणे Jerusalem (इस्राईल ची राजधानी) ला ज्यूड, ख्रिश्चन आणि इस्लामिक लोक त्यांचं धार्मिक स्थळ म्हणून ओळखतात तीच ओळख माटेरा ची सुद्धा युरोपियन लोकांमध्ये आहे.

माटेरा मध्ये असलेल्या “Sassi” लेण्यांमुळे सुद्धा माटेरा शहराला एक अनन्य साधारण महत्व आहे. Archeological सर्व्हे नुसार ही लेणी जवळपास ८००० वर्ष जुनी आहे.

लोकांनी इथे येऊन थोडा वेळ घालवावा यासाठी माटेरा चं पर्यटन खातं हे सतत नवीन कल्पना शोधून काढत असतात.

 

matera sassi inmarathi

 

आतापर्यंत या लेण्यांमध्ये ३०० सांस्कृतिक कार्यक्रम, वर्कशॉप्स, कॉन्फरन्स आणि प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये संगीत, पाककला आणि साहित्य यांचा समावेश आहे.

या प्रत्येक कार्यक्रमात युरोपियन संस्कृतीचं लोकांना दर्शन घडवण्यासाठी आणि त्याचं महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

तुम्हाला जर का एक वर्षांसाठी माटेरा चा व्हिसा हवा असेल तर त्याची फी केवळ २२ US डॉलर्स इतकीच ठेवण्यात आली आहे. माटेरा हे पूर्ण शहर एकूण ४५० किलोमीटर इतक्या भागात आहे.

माटेरा हे शहर सुंदर राहण्याचं अजून एक कारण म्हणजे तिथे प्रदूषण फार कमी आहे. तिथे ना फार गाड्या धावतात ना हाय स्पीड ट्रेन आहे ना एअरपोर्ट आहे.

त्यामुळे तिथे गेल्यावर लोक तिथल्या शांततेच्या प्रेमात पडतात.

आणि creative लोक जसे की लेखक, संगीतकार, मुर्तीकार तिथे जाऊन आपली कला आणि शहराच्या गोंगाटात कुठेतरी ‘अर्धवट राहिलेली स्टोरी’ पूर्ण करतात.

माटेरा मध्ये किती तरी फिल्म्स ची शुटिंग सुद्धा होत असते. मेल गिब्सन यांच्या “The Passion of Christ” या सिनेमाचं आणि “The Gospel According to St Matthew” या सिनेमांचं माटेरा इथे शुटिंग झालं होतं.

माटेरा या शहराला सुशोभित करण्यासाठी Ariane Bieou या फ्रेंच हेरिटेज एक्स्पर्ट कडून सुद्धा मदत घेण्यात आली आहे.

त्यांनी सुचवलेले बदल आमलात आणल्यानेच माटेरा हे १९९३ पासून UNESCO World Heritage Site म्हणून ओळखलं जातं.

 

matera 4 inmarathi

 

Ariane Bieou यांनी एक स्लोगन तयार करून दिलं आहे : “Matera is calling Europe and Europe is calling Matera”.
म्हणजे युरोप मध्ये आलात आणि माटेरा नाही बघितलं तर काय बघितलंत?

सांस्कृतिक राजधानी मध्ये शहराचं परिवर्तन होत असताना एक अडचण असते ती म्हणजे योग्य टुरिझम मॉडेल असण्याची.

एकदा की लोकांना पर्यटक आपल्या शहरात येत आहेत असं दिसतं तेव्हा प्रत्येक जण हा आपलं घर renovate करतो आणि तिथे टुरिस्ट ला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून उत्पन्नाचं साधन तयार करतो.

त्यामुळे ज्या शहराची ओळख ही तिथल्या घरांच्या रचनेमुळे झालेली आहे ती ओळख निघून जात आहे.

आणि काही दिवसात माटेरा सुद्धा व्हेनिस शहरासारखं फक्त गजबजलेलं शहर होऊ नये यासाठी अनुभवी लोक हे शहराच्या स्लो टुरिझम साठी सुद्धा तयार आहेत.

 

venice inmarathi

 

लोवर माटेरा मध्ये तुम्ही 150 rocks church हे ठिकाण बघायला पाहिजे. या भागात सध्या आपलं घर, प्रॉपर्टी यांना टुरिझम हॉटेल मध्ये बदलण्यासाठी स्पर्धा सुरू आहे.

कित्येक हॉटेल्स ने पर्यटकांच्या सोयीसाठी वेस्पा आणि तीन चाकी रिक्षा या भाड्याने देणं सुरू केलं आहे.

Vito Cuscianna या २७ वर्षीय बिजनेसमॅन ने ही प्रतिक्रिया दिली की,

“माझे आजोबा ९० वर्षांचे आहेत. ते शेती करायचे आणि Sassi caves मध्ये रहायचे. त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती की अश्या ऐतिहासिक ठिकाणी सुद्धा Wifi, जकुझी सारख्या गोष्टी सुद्धा लोकांसाठी उपलब्ध झालेल्या असतील.”

रफालो रुगेरी हे आता त्यांचं निवृत्त वकिलाचं आयुष्य जगत आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,

“आमच्याकडे सुद्धा खूप राजकारण चालतं. पण, जेव्हा Sassi च्या अस्तित्वाचा आणि विकासाचा विषय असायचा तेव्हा आमचं नेहमी एकमत असायचं.

आमचा एक मोठा ग्रुप होता ज्यामध्ये Law, मेडिकल, हाऊसवाईफ अश्या वेगवेगळ्या भूमिकांमधले लोक होते. कोणीही Archeoligical expert नव्हतं.

पण, आमचा हेतू चांगला होता म्हणून आज हे दिवस बघू शकलो. त्यावेळी मी फक्त २३ वर्षांचा होतो.”

कोणत्याही जागेचा कायापालट करण्यासाठी एकमत असलेलं नेतृत्व आणि आपल्या देशाबद्दल तळमळ असलेले लोक असावे लागतात हे आपण माटेरा च्या स्टोरीतून बघू शकतो.

 

matera caves inmarathi

 

कारण, सांस्कृतिक वास्तू या जगभरात आहेत. पण, खूप कमी जणांमध्ये त्यांना जगासमोर आणायचं vision आहे.

नाही तर आपल्या महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले आणि अजिंठा लेणी हे कायम संवर्धन आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत आपल्याला दिसले नसते.

गरज आहे की ती त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यची. तोपर्यंत, “कुछ दिन तो गुजारो माटेरा मे…” या कृतिशील आवाहनाला प्रतिसाद देऊयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?