खुर्चीला फुगे लावुन उडणारा माणूस, वाचा या तुफानी वागण्यामागील कारण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मार्केटिंग साठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्विस चांगली असेल तर त्याचं मार्केटिंग आपोआप होते.
मार्केटिंग चे गुरू फिलिप कोटलर यांच्या मते, मार्केटिंग म्हणजे केवळ निर्माण झालेल्या गरजेची योग्य वेळी आणि योग्य दरात पूर्तता करणे.
हे इतकं सोपं असतानाही काही लोक त्यांच्या अति स्मार्टनेस मुळे किंवा insecurity मुळे सतत काही ना काही शक्कल लढवत असतात आणि त्यांच्या सध्याच्या आणि होऊ घातलेल्या कस्टमर्स ला irritate करत असतात.
टेली कॉलिंग हा त्यातलाच एक प्रकार. काही कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट आणि गुणवत्तेकडे लक्ष न देता केवळ प्रसिद्धीकडेच लक्ष देतात.
सतत लोकांना फोन केल्याने ते कधी तरी त्यांची वस्तू किंवा सर्विस घेता येतील असा त्यांना एक विश्वास असतो.
आजकालचे ग्राहक लक्षात घेतले तर एक strategy नेहमी बोलली जाते ती ही – ‘Less is More’. याचं कारण म्हणजे, दिवसेंदिवस लोकांची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे.
तुमचं बोलणं कमी पण योग्य शब्दात मांडलं तर लोकांपर्यंत पोहोचतंच असं सगळे तज्ञ सांगतात.
कॅल्गरी हे कॅनडा मधील एक शहर आहे. तिथे राहणाऱ्या डॅनियल बोरिया या व्यक्तीने मार्केटिंग करण्याची एक पद्धत शोधून काढली होती.
आपल्या लहानपणी बघायचो की, सायकल कंपनी त्यांची जाहिरात करण्यासाठी एखादा बलून उंचावर नेऊन ठेवायची आणि त्यांची जाहिरात शहरभर व्हायची.
अजून एक पद्धत होती की, कोणत्याही इव्हेंटच्या ठिकाणी एक पॉवरफुल लाईट आकाशाकडे सोडला जातो आणि त्या शहरातील सर्व लोकांचं लक्ष आकर्षून घेतलं जातं.
डॅनियल बोरिया यांनी या स्टेप्स च्या पुढे जाऊन एक ‘पब्लिसिटी स्टंट’ केला होता. डॅनियल बोरिया हे क्लिनिंग प्रॉडक्ट्स विकतात.
एकाच वेळी पूर्ण कॅल्गरी शहराचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी शंभर हेलियम गॅस ने भरलेले बलून एकत्र केले. रविवारचा दिवस होता. त्या बलून ला त्यांनी त्यांची एक खुर्ची बांधली.
स्वतःच्या कंपनीचं बॅनर त्यांनी सर्वात खाली बांधलं आणि एक पॅराशूट स्वतः त्या बलून च्या चेअर मध्ये बसले आणि आकाशात ५००० फुट उंचीवर स्वतः गेले.
या प्रमोशन इव्हेंट साठी डॅनियल बोरिया यांनी दोन महिने आधीपासून तयारी सुरू केली होती.
एक वेळ आली होती जेव्हा डॅनियल यांना टेक ऑफ करणारे आणि लँडिंग करणारे विमान अगदी जवळ दिसत होते.
२६ वर्षीय डॅनियल बोरिया यांच्यासाठी हा अनुभव खूप रोमांचकारी होता. त्यांनी एका वृत्तवाहिनी ला प्रतिक्रिया देतांना सांगितलं की,
“हा एक अद्भुत अनुभव होता. मी एकटाच त्या २० डॉलर च्या lawn chair वर बसलेलो होतो आणि मी ढगांच्या वर आकाशात जात होतो.”
हा उत्साह किंवा हे थ्रिल थोड्या वेळांसाठीच होतं. कारण काही वेळातच डॅनियल बोरिया यांनी त्यांनी सोबत नेलेलं पॅराशुट ओपन केलं आणि जमिनीवर उडी मारली.
जमिनीवर उतरताच कॅलगरी च्या पोलिसांनी डॅनियल बोरिया यांचं स्वागत केलं आणि त्यांना त्यांच्या या जीवघेण्या कृत्यासाठी अटक केली.
डॅनियल यांनी पोलिसांना सांगितलं की, ते पॅराशुट ला कॅल्गरी च्या स्टॅम्पेड मध्ये लँड करणार होते. पण, खराब वातावरण असल्याने ते काही किलोमीटर लांब शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या इंडस्ट्रीयल एरिया मध्ये लँड झाले.
डॅनियल बोरिया यांचा पाय फक्त मुरगळला होता. त्याव्यतिरिक्त त्यांना कोणतीही इजा झाली नव्हती.
हा पब्लिसिटी स्टंट करताना त्यांना फक्त इजा होईल आणि ते पोलिसांकडे जाऊन ‘फेमस’ होतील हे डॅनियल यांनी गृहीत धरलं होतं.
मार्केटिंग च्या या कामासाठी डॅनियल बोरिया यांना २०,००० डॉलर्स इतकी किंमत मोजावी लागली होती.
यासाठी त्यांनी एक छोटं विमान सुद्धा हायर केलं होतं ज्याने की स्टॅम्पेड च्या भोवतीचा एरिया मध्ये डॅनियल यांच्या कंपनी च्या बॅनर ने घिरट्या मारून जाहिरात केली होती.
हा स्टंट करण्याचं कारण हे डॅनियल बोरिया यांना वाटणारं ‘आज कुछ तुफानी करते है’ हेच फिलिंग होतं.
या ऐवजी एक प्लॅन B सुद्धा बोरिया यांच्या डोक्यात होता. त्यांनी एका मार्केटिंग एजन्सीला स्टॅम्पेड इथे येणाऱ्या गर्दीला आकर्षित करण्यासाठी हेलिकॉप्टर ने जाहिरात करण्यासाठी विचारपूस केली होती.
पण, तो एक ‘नो फ्लाय झोन’ असल्याने त्या मार्केटिंग एजन्सी ने डॅनियल बोरिया यांना नकार दिला होता आणि मग त्यांनी स्वतःच हा स्टंट करायचं ठरवलं.
त्यासाठी त्यांनी lawn chair, बलून, ऑक्सिजन टॅंक या सर्व गोष्टी एकत्रित केल्या आणि या थरार चा अनुभव घेतला.
पोलिसांनी बोरिया यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवून सोडून दिले आणि ही प्रतिक्रिया दिली,
“कोणतीही मार्केटिंग साठी करण्यात आलेली कृती ही तुमच्या जीवापेक्षा महत्वाची नाहीये. Lawn चेअर ने कोणालाही इजा झाली असती. बलून मधला गॅस संपून ते कधीही खाली येऊन लोकांच्या डोक्यावर पडू शकले असते.
स्टॅम्पेड ही पर्यटकांनी गजबजलेली जागा आहे. त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षे बद्दल न विचार करता असा स्टंट करणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचं आहे.”
डॅनियल बोरिया यांनी हा पूर्ण स्टंट रेकॉर्ड करून त्याचा विडिओ सुद्धा वायरल केला होता. नियोजित दिवसाच्या आदल्या दिवशी सुद्धा डॅनियल यांनी सराव केला होता.
त्यांना कदाचित या स्टंट मुळे प्रसिद्धी मिळाली सुद्धा असेल. त्यांना त्यातून मिळालेल्या बिजनेस मुळे त्यांचा हा जाहिरात खर्च सुद्धा वसूल झाला असेल.
पण, एका दिवसा साठी का असेना, पण त्यांना पोलीस ठाण्यात रहावं लागलं हे त्यांचे ग्राहक आणि ते स्वतः ही गोष्ट कधीच विसरू शकणार नाहीत हे तितकंच खरं आहे.
तेव्हा तुमच्या नोकरीमध्ये किंवा बिजनेस मध्ये तुमचा बिजनेस परफॉर्मन्स सुधरवण्यासाठी तुमच्या जीवावर बेतेल असं कोणतं साहस करू नका.
‘घरी तुमचं कोणी तरी वाट पहात आहे’ हे कायम लक्षात ठेवा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.