Site icon InMarathi

एकेकाळी कायदेशीर असणाऱ्या या पदार्थांच्या व्यापारावर बंदी का घालण्यात आली, वाचा

drugs legal inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ड्रग्स मुळे एक पिढीच्या पिढी कशी वाया गेली हे आपण उडता पंजाब सारख्या सिनेमातून पाहिलं. ड्रग्स च्या विळख्यात अडकलेलं पंजाब आणि तिथल्या तरुण मुलांचं आयुष्य कसं वाया गेलं हे त्यातून आपल्याला समजलं!

पण ड्रग्स हि केवळ एका देशाची किंवा राज्याची समस्या नसून साऱ्या जगाची समस्या आहे!

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या केस मध्ये सीबीआय उतरायच्या आधी केंद्राचं अंमली पदार्थ विरोधी पथक उतरले.

आणि रिया चक्रवर्ती सोबत बॉलिवूड मधले अनेक नामांकित सिने नट-नट्या एनसीबीच्या गळाला लागले.

 

 

आत्महत्ये कडून फिरत फिरत ही केस अशी काही फिरली की हा सगळा विषय ड्रग्ज, विड सारख्या बंदी असलेल्या अंमली पदार्थाच्या वापरा पर्यंत आला आहे.

सुशांतसिंगने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा शोध दाखल झालेली केंद्रीय पथकं घेतीलच.

पण ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा विषय आलाच आहे तर तुम्हाला माहीत आहे का, की भारतात १९८५ पर्यंत हेच अंमली पदार्थ कायदेशीर होते?

आधी बघूया ड्रग्ज, विड किंवा तत्सम अंमली पदार्थ म्हणजे नेमकं काय?

हे पदार्थ ज्या झुडुपा पासून बनतात त्याचं वैज्ञानिक नाव आहे कॅनाबीस सतिवा (Cannabis Sativa).

याच्या सुकलेल्या पानांचा वापर करून मारीजुआना (Marijuana) तयार केला जातो. मारीजुआनाला स्थानिक भाषेत चरस, गांजा, माल किंवा पॉट म्हणून देखील संबोधले जाते.

 

 

याच झुडपा पासून भांग देखील बनवली जाते. या झुडुपाद्वारे अंमली पदार्थाचे उत्पादन घेणे १९८५ पर्यंत कायदेशीर होते.

भांग आणि भारतीयांचं तसं जून नात आहे. पुरातन काळापासून भारतीय भांगेचं सेवन करत आले आहेत.

इसवी सन पूर्व १००० पासून भारतीय समाजात या भांगेचं अस्तित्व दिसून आलं आहे.

पाच पवित्र वनस्पती मध्ये या कॅनाबीसच्या झुडपाची गणना होत असे. आयुर्वेदामध्ये तर हीच वनस्पती औषधोपचारासाठी वापरली जायची.

पेनिसिलिन च्या स्वरूपात याचा वापर आयुर्वेदात सांगितला आहे.

 

 

मध्ययुगात पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश या युरोपीय राष्ट्रांचा भारतात हस्तक्षेप सुरू झाल्यावर त्यांना दिसून आलं की भारतात भांग आणि तत्सम अंमली पदार्थांचा पद्धतशीरपणे व्यापार सुरू आहे.

फक्त पैसा आणि संपत्तीसाठी भारतात आलेल्या या युरोपियन देशांनी हा व्यापार करयुक्त केला. आणि या टॅक्स मधून मोठी अशी रक्कम त्यांना मिळू लागली.

कालांतराने भारतात नशा आणि अंमली पदार्थाचा वाढता वापर बघून ब्रिटिशांनी वेळोवेळी यावर बंदी घातली. परंतु रेव्हेन्यूवर होणारा परिणाम पाहता त्यांनी ही बंदी काढून टाकली.

१८३८, १८७१, १८७७ मध्ये ब्रिटिशांनी गांजा आणि भांगेवर बंदी घातली होती.

पाब्लो एस्कॉबार या कुप्रसिद्ध ड्रॅग तस्कराच्या उदयानंतर अमेरिकेत ड्रग्जचा सुळसुळाट सूरू झाला. येऊ घातलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने सिंथेटिक ड्रग्जच्या नावाखाली अनेक अंमली पदार्थांवर बंदी घातली.

 

१९६१ मध्ये अमेरिकेच्या दबावाखाली आशियात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या गांजा वर बंदी घालण्याचे संयुक्त राष्ट्रामध्ये Single Convention on Narcotic Drugs नावाची आंतरराष्ट्रीय संधी पास केली गेली.

परंतु भारताने यावर सही करण्यास नकार दिला.

पुढे अमेरिकेच्या दबावाखाली राजीव गांधी यांनी १९८५ मध्ये नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टनसेस ऍक्ट करून भारतात अंमली पदार्थांवर बंदी घातली.

त्यामुळे गांजा आणि चरस वर बंदी घातली गेली. परंतु भांगेची विक्री ही प्रत्येक राज्यांच्या अखत्यारीत सोडून दिले.

नंतर अमेरिकेनेचं यावर दुहेरी भूमिका घेत आपल्या २७ राज्यात वैद्यकीय संशोधन आणि औषध निर्मितीचे कारण देऊन गांजा किंवा कॅनाबीसचे उत्पादन कायदेशीर केले.

आज जगात जवळपास ४० देशात याचे कायदेशीर रित्या उत्पादन घेतले जाते.

हेम्प (मारीजुआना पासून तयार केलेलं प्रोडक्ट) इंडस्ट्री हे बॉडी केअर प्रोडक्ट, फूड सप्लिमेंट, प्लास्टिक सारखे उत्पादन घेते. आणि यांचा वार्षिक बिझनेस हा ४४ बिलियन डॉलर एवढा आहे.

 

 

हा आकडा फक्त अमेरिकेतील आहे आणि असेच आकडे भारताच्या बाबतीत सुद्धा दिसून येत आहेत.

फॉर्ब्जने केलेल्या सर्व्हेनुसार हेम्प इंडस्ट्री भविष्यात प्रोडक्शन इंडस्ट्री पेक्षा कैक पटीने रोजगाराची निर्मिती करेल.

एकूणच नशेबाजी सोडली तर या कॅनाबीसचे पॉझिटिव्ह रिझल्टपण दिसून येत आहेत.

भारतात मारीजुआना बॅन केल्यानंतर मात्र कोकेन, ब्राऊन शुगर सारख्या सिंथेटिक अंमली पदार्थांच्या सेवनात वाढ झाली आहे.

तेच अमेरिकेत लीगल केल्यानंतर सिंथेटिक ड्रग्जचा वापर कमी झालेला आहे.

हे ड्रग्ज भारतात बनत नसले तरी तस्करीच्या मार्गाने ते भारतात या ना त्या रस्त्याने येतच आहे. उडता पंजाब, यारा सारख्या फिल्म मधून हे कित्येक वेळा दाखवून दिलं आहे.

 

 

अंमली पदार्थाच्या वापरामुळे वाया जाणारी तरुणाई पाहता त्यावर बंदी असणे हे जरी योग्य असले.

तरी त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट पाहता ज्या क्षेत्रात त्याचा वापर करणे सोयीस्कर आहे तिथे त्याला सूट देण्यास हरकत नसावी.

परंतु प्रत्येक कायद्याला असणारी पळवाट पाहता भारतात जर हे काही प्रमाणात जरी लीगल झालं तरी त्याचा सुळसुळाट नक्की होईल यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version