Site icon InMarathi

“पढेगा” इंडिया तभी तो बढेगा इंडिया; अरुणाचल प्रदेशमधील ही भन्नाट कल्पना बघाच

street library inmarathi5

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“वाचाल तर वाचाल” महामानव डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी ह्या वाक्याने तरुणांना संबोधित केले होते, ते काही उगाच नाही.

स्वतः हजारो पुस्तकांचा अभ्यास करून, सखोल ज्ञान प्राप्त करून, ज्ञानाच्या प्रकाशने शेकडो लोकांच्या जीवनातील अंधःकार मिटवण्याचा मार्ग, त्यांना गवसला. हे सगळे फक्त आणि फक्त पुस्तकांमुळे शक्य झाले.

मानवी जीवनातील अशी कुठलीच समस्या नाही ज्याचा उपाय पुस्तकांत सापडणार नाही. आरोग्य -फिटनेस पासून, इतिहास, देवधर्म, पैशांचा निवेश, भटकंती, फूड अँड क्युझिन, मानसिक स्वास्थ्य, गर्भ संस्कार यां सगळ्यांबद्दल पुस्तकात इत्यंभूत माहिती असते.

पुस्तक म्हणजे, “शब्दांच्या साहाय्याने पानांवर उतरविलेले जग”.

 

 

पण काही लोकांच्या दुर्दैवामुळे त्यांना ही ज्ञानाची खाण, इच्छा असूनही सहज प्राप्त होत नाही. काही वाचकांची आर्थिक स्थिती कमजोर असते, काही ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे जसे – डोंगराळ प्रदेशातील रहिवासी, जंगलातील आदिवासी यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे सामान सुद्धा शहरातून, आपल्या वस्ती जवळच्या तालुक्यातून आणावे लागते, अशा ठिकाणी पुस्तकं सहज उपलब्ध असणे जरा कठीणच.

ह्या पुस्तक प्रेमींना येणाऱ्या समस्या झाल्या, पण भारताच्या कैक करोड जनते मधील काही टक्के लोकांनाच पुस्तक वाचनाची आवड आहे.

टीव्ही, मोबाईल या सगळ्यांमुळे व यांच्या गती मुळे, ५००-१००० पानांची पुस्तकं वाचायला लोकांना नक्कीच कंटाळा येतो, पण वाचन हे मानसिक विकास, आकलन शक्ती वाढवण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी नितांत आवश्यक असतात.

याच समस्यांवर उपाय म्हणून, अरुणाचल प्रदेशातील गुरांग लर्निंग इन्स्टिट्युटच्या मीना गुरांग यांनी, रायो निर्जुलीतील आपल्या राहत्या घराजवळ एक “स्ट्रीट लयब्ररी” सुरू केली आहे.

ह्या लायब्ररीचे वैशिष्ट्य असे, की ह्या लायब्ररीचा उपयोग करून घेण्यासाठी वाचकाला कुठल्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही. वाचक इथली पुस्तकं अगदी मोफत वाचू शकतात.

 

 

मिझोरमच्या अशाच एका फ्री लायब्ररीच्या संकल्पने वरून प्रेरित होऊन बँगलोर येथून अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केलेल्या मीना व जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी येथे PhD चे शिक्षण घेत असलेली त्यांची बहीण रीना गुरांग व इंग्लिश ऑनर्स पदवीधरअसलेले त्यांचे मित्र दिवांग होआसी या तिघांनी मिळून रायो, निर्जुली येथील आपल्या राहत्या घराजवळच मिनी स्ट्रीट लायब्ररीची सुरुवात केली.

विशेषतः महिला सशक्तीकरण व तरुण पिढीला वाचनाचे महत्त्व कळावे, गोडी लागावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

तिथे विविध प्रकारची पुस्तकं, वाचकांसाठी बसायला आकर्षक बाका व डेस्क यांची पण सोय आहे. शिवाय पुस्तकांच्या रॅक ला कोणत्याही प्रकारचे दार नाही आहे.

“पुस्तकं चोरीला जाण्याची मला अजिबात भीती नाही वाटत. कारण कोणी ती चोरलीच, तर वाचण्यासाठीच चोरी करतील, या शिवाय अजून तरी कोणता उपयोग होईल पुस्तकांचा?

वाचनाची गोडी निर्माण व्हावी, लोकांनी, स्त्रियांनी विचार करायला सुरुवात करावी हेच तर ह्या लायब्ररी मागील हेतू आहे. पुस्तकं चोरी करून वाचणे अथवा इथे येऊन वाचणे, दोन्ही मार्ग शेवटी वाचानाकडेच जातात. त्यामुळे मला याची अजिबात चिंता वाटत नाही” असे मीना गुरांग यांचे म्हणणे आहे.

फक्त पाऊसापासून बचाव व्हावा म्हणून त्या रॅकला, प्लॅस्टिकच्या पडद्यांनी कव्हर करण्यात आले आहे.

सुरुवातीला तब्बल १०,००० रुपये किमतीची बरीचशी पुस्तकं मीनाने, स्वखर्चाने विकत घेतली व अजून १०,००० खर्च करून पूर्ण लाकडी रॅक, बेंच व डेस्क बनवून घेतले.

 

 

घेतलेल्या पुस्तकांपैकी जवळपास ७०-८० पुस्तकं लायब्ररीत असून, उर्वरित पुस्तकं मीनाच्या घरी आहेत. तिथून सुद्धा वाचक पुस्तकं नेऊ शकतात.

मीनाच्या म्हणण्यानुसार,

“त्यांचे प्रेरणा स्त्रोत जरी मिझोराम असेल, तरी अरुणाचल प्रदेशाची समस्या थोडी वेगळी आहे. तेथील ११वी १२वी च्या विद्यार्थ्यांची भाषा, लेखन कौशल्य, भरपूर कच्चे आहे. पुस्तकांमार्फत ह्या समस्येवर नक्कीच तोडगा काढता येईल अशी त्यांना अशा आहे.”

लहानपणा पासूनच मीना गुरांग यांना महिला सशक्तीकरण, विधवा सबलीकरण, बालविवाह रोखण्यासाठी लढणे या सगळ्याच विषयांनी वेधून घेतले.

समाजातील असे अनैतिक व माणसाला अधोगती कडे नेणारे घटक कायमचे काढून टाकायचे असतील, तर विचारांच्या कक्षा रुंदावल्या जायला हव्यात असे त्यांना जाणवू लागले.

हे काम फक्त पुस्तकं करू शकतात त्यामुळे त्यांनी ही लायब्ररी सुरू केली. कामगार महिला, गृहिणी, १० वर्षे वयोगटा पर्यंतची मुले या लायब्ररीचे नियमित स्वरूपाचे वाचक आहेत.

 

 

किशोरवयीन मुलांना रस्त्याच्या कडेला बसून पुस्तकं वाचायला जरा अवघडल्यासारखं वाटतं त्यामुळे काही वाचकांनी, पुस्तकं घरी वाचायला देण्याची मागणी केली.

“पुस्तकं इथे येऊन वाचली काय किंवा घरी नेऊन वाचली काय, दोन्ही पद्धतींनी आमचाच हेतू साधल्या जातो.” या विचाराने गुरांग यांनी खुशाल पुस्तकं घरी नेऊन वाचण्याची सुद्धा मुभा वाचकांना दिलेली आहे.

शिवाय लायब्ररी पर्यंत जास्तीत जास्त मुलांनी पोहोचावे म्हणून, त्यांना चॉकलेट्स सुद्धा वाटण्यात येतात.

गुरांग यांच्या गुरांग लर्निंग इन्स्टिट्यूटद्वारे, आत्ता पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ह्या सेल्फ हेल्प लायब्ररीच्या प्रयोगाला नागरिकांनी व पुस्तकं प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. काही वाचकांनी पुस्तके दान सुद्धा दिली आहेत.

 

 

याच बरोबर विद्यार्थ्यांचा सुद्धा ही लायब्ररी सुरू करण्यात बराच वाटा असून “पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया” या मिशनला हातभार लावला गेला आहे.

“देवाज्ञा झालेल्या आमच्या वडिलांची आठवण म्हणून सुरू केलेली ही स्ट्रीट लायब्ररी लोकांना इतकी भावली हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद होतो. हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे व अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक अशा गावात जिथे पुस्तकालयांपेक्षा वाईन शॉप जास्त आहेत, तिथे आम्हाला आमची ही लायब्ररी पोचवायची आहे.” असे या दोन बहिणींनी ठरविले आहे.

१९९१ मध्ये असलेला अरुणाचलची साक्षरता जी ४१.६% होती, ती २०११ मध्ये वाढून, ६५.४% इतकी झाली आहे.

अशा प्रकारचे उपक्रम राज्यातील निरक्षरता घालवून, साक्षरतेचा प्रचार नक्कीच करतील. फक्त एकच राज्याला यांसारख्या उपक्रमांची गरज नसून  संपूर्ण देशाला यांची गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version