Site icon InMarathi

दिशा – सुशांत प्रकरणात नितेश राणेंचे एकामागे एक धक्कादायक गौप्यस्फोट…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका गुणी आणि मेहनती अभिनेत्याचा रहस्यमयी मृत्यू फिल्म इंडस्ट्रीचा बीभत्स चेहरा बाहेर आणू शकेल ह्याचा कुणी विचार सुद्धा केला नसेल, पण सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचे ग्रह फिरले असं म्हणायला हरकत नाही.

फिल्म इंडस्ट्रीचे अंडरवर्ल्ड तसेच ड्रग्स कनेक्शन, नेपोटीजम, फेव्हरेटीझम, माफिया अशा कित्येक गोष्टी उघडपणे लोकांच्या समोर आल्या.

आजवर सगळ्यांना हे माहीत होतं पण सुशांतच्या मृत्यूनंतर ह्या गोष्टीवर उघडपणे निर्भीडपणे बोललं जाऊ लागलं, सोशल मीडिया वर समाजातल्या प्रत्येक स्तरातून प्रश्न उभे केले गेले.

 

 

कारण जे परवीन बाबी यांच्या बाबतीत घडलं जे जिया खान च्या बाबतीत घडलं तेच सुशांत सारख्या टॅलेंटेड आणि गुणी कलाकाराच्या बाबतीत घडू नये म्हणूनच लोकांनी आवाज उठवला.

आणि अखेर सरकारला ही केस सीबीआय कडे सुपूर्त करावी लागलीच!

सुशांतच्या मृत्यूआधी त्याची सेक्रेटरी दिशा सलीयान हिने सुद्धा आत्महत्या केल्याचं समोर आलं आणि तिथून ह्या सगळ्या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं.

ह्या सगळ्यात प्रमुख संशयित रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी करून सीबीआय ने तिला ताब्यात घेतलं आहे.

एकंदरच ह्या सगळ्या प्रकरणाला ड्रग माफियाच वळण मिळत असतानाच भारतीय जनता पक्षाचे एमएलए आणि नारायण राणे ह्यांचे सुपुत्र नितेश राणे ह्यांनी रिपब्लिक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत एक वेगळाच गौप्यस्फोट केला.

हि आत्महत्यांची थेअरी म्हणजे थोतांड असून हा प्रकार एक वेल प्लॅन मर्डर असल्याचं त्यांच्या ह्या मुलाखतीतून स्पष्ट होत आहे!

 

 

सुशांत प्रकारणात संपूर्ण मीडिया निर्विकार असताना फक्त रिपब्लिक टीव्हीने हा मुद्दा उचलून धरला आणि या प्रकरणातले बरेच दुर्लक्षित पैलू समोर आणले.

मुंबई पोलिसांच्या तापसातली हेळसांड, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची केलेली गळचेपी, अशा कित्येक गोष्टी अर्णब गोस्वामी च्या चॅनल च्या माध्यमातून लोकांसमोर आल्या.

शिवाय सध्या सत्तेत असलेल्या बऱ्याच मोठ्या लोकांचं सुद्धा ह्यात कनेक्शन असल्याचं रिपब्लिक चॅनल च्या माध्यमातूनच बाहेर आलं.

जर ह्या चॅनल ने हा मुद्दा उचलून धरला नसता तर इतर आत्महत्या प्रकरणाप्रमाणे हे प्रकरण सुद्धा लोकं विसरून गेले असते. ह्याच चॅनल वर नितेश राणे ह्यांनी नेमका काय गौप्यस्फोट केला आहे ते पाहूया!

ह्या मुलाखतीत नितेश राणे यांनी सुशांत सिंग च्या मृत्यशी निगडित सर्वात जास्त चर्चिली जाणारी जी कॉन्स्पिरसी थेअरी आहे तिच्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं आहे.

सुशांतची सेक्रेटरी दिशाचा सुशांतच्या मृत्यशी असलेला संबंध, तिचा मृत्य हा आत्महत्या की अपघाती मृत्य अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.

 

 

महाराष्ट्र सरकार आणि इतर राजकीय पक्षांचं सुद्धा ह्या प्रकरणात कनेक्शन असल्याने ह्याला एक वेगळ्याच प्रकारचे राजकीय वळण सुद्धा मिळालं आहे!

ह्या मुलाखतीत नितेश राणे म्हणतात की – “आजवर मांडल्या गेलेल्या आत्महत्येच्या थेअरीज सगळ्या भंपक आणि चुकीच्या आहेत. दिशा सलीयान ला मारलं गेलं आहे!”

पुढे ते म्हणतात की –

८ जूनच्या पार्टी मध्ये दिशाला जायची इच्छा नव्हती पण काही ‘पॉवरफुल लोकांच्या’ आग्रहाखातर तिला तिथं जावं लागलं, तिथं तिच्याबरोबर काहीतर विपरीत घडलं ज्याची तिने सुशांतला माहिती दिली.

सुशांत ने हा सगळा प्रकार रियाच्या कानावर घातला. रिया ने त्या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीला याबद्दल सांगितलं.

दिशा जेंव्हा त्या पार्टीतुन तिच्या स्वतःच्या घरी पोचली तेंव्हा तिचा फियांसे रोहन राय हा तिथे पोचला होता, आणि या नंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी समोर आली!

शिवाय हे सगळं सांगताना त्यांनी रोहन राय ह्याला सुद्धा सीबीआय ने समन धाडावा अशी मागणी केली असून, रोहनशी ते स्वतः बोलले आहेत असंही त्यांनी ह्या मुलाखतीत म्हंटलं आहे.

 

 

तसंच ठाकरे सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी लोकांना न घाबरता त्याने या बाबतीत सगळं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे असंही नितेश राणे रोहनशी बोलल्याचं या मुलाखतीतून समोर आलं!

पुढं ते म्हणाले की “८ जूनच्या पार्टीत काय झालं हे सगळं त्याने मला सांगितलं असून, तू घाबरू नकोस तुला कोणतंही प्रोटेक्शन हवं असल्यास मी देईन असंही मी त्याला बोललो.

तो मुलगा खुप नॉर्मल फॅमिली बॅकग्राऊंड मधून इथं सिनेमात करियर करण्यासाठी आला असून त्याच्यावर खुप दबाव टाकला जात आहे, आणि ते होणं साहजिक आहे. सीबीआय ने रोहन ची चौकशी करावी!”

नितेश राणे ह्यांनी ही जी काही माहिती दिली आहे त्यावरून ह्या कॉन्स्पिरसी थेअरीला एक भक्कम आधार मिळाला आहे.

यावरून सुशांतच्या आणि दिशाच्या मृत्यूमागे बऱ्याच पॉवरफुल लोकांचं कट कारस्थान शिजत असल्याचं स्पष्ट होत आहे.

सीबीआयची चौकशी चालूच आहे, तरी येणारा काळच सांगू शकेल कि सुशांत सारख्या गुणी कलाकाराने खरंच आत्महत्या केली की राजकीय सत्ता आणि ग्लॅमरच्या धुंदीत वाहवत जाणाऱ्या लोकांच्या कट-कारस्थानात त्याचा हकनाक बळी गेला!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version