या कंपनीत कामासाठी नव्हे, तर चक्क झोपण्यासाठी पगार मिळतो. ते ही एक लाख रुपये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
झोप – आपल्या आयुष्यतील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक. निरोगी आयुष्यासाठी सकस आहार आणि झोप ह्या दोन गोष्टींना सर्व हेल्थ एक्स्पर्ट कडून पहिलं प्राधान्य दिलं जातं.
विज्ञानाच्या दृष्टीने कमीत कमी सहा ते आठ तास झोप घ्यावी असं नेहमी सांगतात. विज्ञानात हे सांगितलेलं असलं तरी झोपेची गरज ही प्रत्येक शरीरासाठी वेगळी आहे.
काही जण सहा तास झोपून सुद्धा दिवसभर फ्रेश असतात तर काही जण नऊ तास झोपून सुद्धा फ्रेश दिसत नाहीत.
काही जण दिवसा काम करणं प्रेफर करतात, तर काही जण रात्री. संगीत क्षेत्रातील उदाहरण द्यायचं तर, ए. आर. रहेमान हे या बाबतीत परफेक्ट असेल.
कारण, त्यांच्या कामाची वेळ ही रोज रात्रीचीच आहे. आपल्याला जितके काही सुंदर गाणी त्यांनी संगीतबद्ध केलं आहे ते सगळे त्यांनी मध्यरात्रीच केलेली आहेत असं त्यांनी कित्येक मुलाखतीत सांगितलं आहे.
भारतात जेव्हा पासून IT इंडस्ट्री ची भरभराट झाली आहे तेव्हापासून कित्येक लोक हे अमेरिकेच्या वेळेनुसार (US shift) मध्ये काम करताना तुम्ही ऐकलं असेलच.
त्या पैकी काही जणांना संध्याकाळी सहा ते सकाळी तीन वाजेपर्यंत शिफ्ट असते. तर काहींना रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत. आरोग्याच्या दृष्टीने हे खरंच चॅलेंजिंग आहे.
लोकांना फक्त IT मधील लोकांचा गलेलठ्ठ पगार दिसतो. पण, त्या मागे त्यांना स्वतःची तब्येत नीट सांभाळणं हे आव्हान कित्येक लोक विसरतात.
पैसे मिळणार असतील तर आपण काहीही करायला तयार होतो हे सुद्धा तितकंच खरं.
आता हेच बघा ना, बँगलोर ची एक कंपनी आहे WakeFit. २०१९ मध्ये सुरू झालेली ही एक स्टार्टअप कंपनी आहे. WakeFit त्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘झोपण्याचा’ पगार देते.
होय, ही टायपिंग mistake नाहीये. १०० दिवस त्यांच्या कंपनी मध्ये रोज ९ तास झोपण्यासाठी WakeFit थोडे थोडके नाही तर १ लाख रुपये इतकं मानधन देते.
अश्या कोणत्या कंपनी बद्दल आपण क्वचितच या आधी ऐकलं असेल. WakeFit ही एक mattress (गादी) तयार करणारी कंपनी आहे.
‘झोपेचं मानधन’ या त्यांच्या ऑफर ला त्यांनी ‘Dreamy Offer’ असं नाव दिलं आहे आणि ती त्यांनी २०२१ मध्ये परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाणून घेऊया काय आहे ही ऑफर ?
‘झोपून राहणं’ हे वाचायला जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपं नाहीये.
WakeFit मध्ये सिलेक्ट होण्यासाठी तुम्हाला त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना हे सिद्ध करून दाखवावं लागतं की, झोप ही तुमच्या आयुष्याची सर्वोच्च गरज आहे.
२०१९ मध्ये सुरू झालेली ही कंपनी म्हणजे यशस्वी बिजनेस मॉडेल म्हणून समोर आलं जेव्हा पदार्पणातच त्यांच्या या ऑफर साठी १ लाख ७० हजार लोकांनी त्यांना जॉईन करण्यासाठी अप्लाय केलं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातील फक्त २३ लोकांचं कंपनी ने सिलेक्शन केलं होतं. WakeFit ने त्यांच्या वेबसाईट वर २०२१ साठी volunteers होण्यासाठी application मागवण्यास सुरुवात केली आहे.
WakeFit या कंपनी चा उद्देश आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत झोपेचं महत्व पोहोचवणं हा आहे.
त्याबरोबरच, एक चांगली झोप तुमची कार्यक्षमता कशी वाढवू शकते याचा awareness लोकांपर्यंत पोहोचवणे हा या कंपनी चा उद्देश आहे.
जे उमेदवार कंपनी ने सिलेक्ट केले आहेत त्यांना WakeFit च्या गादीवर झोपावं लागेल आणि पुढील १०० दिवसांसाठी त्या प्रत्येक व्यक्तीच्या झोपेच्या गरजा आणि झोपेच्या सवयी यावर कंपनी अभ्यास करत असते.
हा पूर्ण प्रोग्राम व्यवस्थित पार पाडण्यासाठी काही counselors ची सुद्धा नेमणुक करण्यात येते आणि त्यासोबतच प्रत्येक उमेदवाराला एक स्लीप ट्रॅकर देण्यात येतं.
प्रत्येक दिवसाच्या झोपेचा डेटा हा मेंटेन केला जातो आणि जी व्यक्ती रोज सलग ९ तास गाढ झोपू शकेल आणि असं १०० दिवस करू शकेल त्यांना प्रोग्राम च्या शेवटी १ लाख रुपयाचं बक्षीस दिलं जातं.
बँगलोरच्या या WakeFit कंपनी ने झोप याबद्दल इतके कॅम्पेन घेतले आणि इतका प्रतिसाद मिळाला की, त्यांना ‘A city that loves to sleep’ अशी टॅगलाईन बँगलोर शहराच्या नावानंतर लावावं अशी त्यांची इच्छा होती.
बँगलोर शहराचं ट्रॅफिक आणि वातावरण हे या झोपप्रिय स्वभावाचं कारण असावं असं काही स्थानिक रहिवासी सांगत असतात.
WakeFit चे CEO श्री. चैतन्य रामलिंगगौडा हे या प्रतिसादाबद्दल लोकांचे आभार मानतात आणि सांगतात की,
“इतर शहरांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. पण, बँगलोर चा प्रतिसाद सर्वात जास्त होता. ८ लोक हे बँगलोर मधले होते. त्यापैकी ५ मुलं होती आणि ३ मुली होत्या.
२५ ते ४५ या वयोगटातील हे सर्व होते आणि ते सगळे IT मधले किंवा मार्केटिंग जॉब करणारे होते.”
भारतातील प्रमुख शहर म्हणजेच हैद्राबाद, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या शहरातील लोकांनी सुद्धा अप्लाय केलं होतं.
शिवाय, १० टक्के application हे भारताच्या बाहेरून US, UK मधून सुद्धा आले होते. पण, बँगलोर इतकी संख्या कोणत्याही एका शहराला मिळाली नाही.
दिवसा किंवा रात्री झोपायचं हा निर्णय WakeFit ने उमेदवारांवर सोडला होता.
या स्पर्धेत २१ भारतीयांनी बाजी मारली तर २ भारताबाहेरील लोकांनी हे सिद्ध केलं की, ‘झोपेपुढे त्यांना इतर कोणत्याच गोष्टीचं महत्व नाहीये.’
२०२१ च्या निवड चाचणीसाठी WakeFit ने लोकांकडून विडिओ स्वरूपात अर्ज पाठवण्याचं आवाहन केलं होतं.
काही दिवसांपूर्वी बँगलोर मध्ये नवीन स्पर्धेच्या शॉर्टलिस्ट झालेल्या लोकांचा ‘personal interview घेण्यात आला होता आणि मग निर्णय घेण्यात आला होता.
लोकांनी पाठवलेल्या कोणत्याही व्हिडिओचा गैरवापर होणार नाही हा विश्वास WakeFit ने लोकांना दिला आहे.
झोप काढणे ही जरी तुमची पॅशन असेल तर त्याला अनुसरून सुद्धा मार्केट मध्ये संधी आहे हा विश्वास लोकांना मार्केट मध्ये उपलब्ध आहेत ही खूप सुखावणारी गोष्ट आहे.
या संधीचा लोकांनी योग्य वेळी फायदा घ्यायला पाहिजे आणि बक्षीस मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा असं आवाहन WakeFit ने केलं आहे.
इतर कोणत्याही कंपनीची अशी जाहिरात आढळल्यास सर्व गोष्टींची खात्री करूनच पुढे जावं असा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ. कारण, तुमचा डेटा, शुटिंग वापरून एखादा गैरव्यवहार सुद्धा होऊ शकतात.
तेव्हा, काम जरी झोपायचं असलं तरीही त्यांची नियमावली वाचताना ‘उघडा डोळे, बघा नीट…’
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.