' खिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…! – InMarathi

खिश्यात बंदूक बाळगा – ‘निडर’ बना…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काळानुरूप शब्दांच्या व्याख्या बदलतात. कालपरवापर्यंत सुरक्षा म्हटलं की ‘सगळ्या धोकादायक वस्तूंपासून लांब रहाणे’ अशी व्याख्या होती. पण आजकालच्या बदलत्या जगात ही व्याख्या सुद्धा बदलली आहे. आता सुरक्षा म्हणजे संकटाचा धिटाईने सामना करणे – असा अर्थ रूढ होतोय.

पण गुंडांना आपण सामोरे कसे जाणार?

समोरून जर कुणी तुम्हाला मारायला, लुटायला, त्रास द्यायला आला आणि तुम्ही काही करू शकणार नाही ह्याची त्याला जर खात्री असेल तर तो थांबणार नाही.

पण जर तुमच्याकडे एखादं शस्त्र असेल – कोणतंही – तर त्या चोराला जरब बसते, तो लुटण्याच्या ऐवजी पळून जाण्याचा विचार करतो.

आणि हेच हत्यार जर एक पिस्तुल असेल तर? जरब बसण्याची शक्यता वाढेल, बरोबर? रहाल ना तुम्ही सुरक्षित?

म्हणूनच सामान्यांना बाळगायला सोपी जाईल अशी एक पिस्तुल पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या अभियाना अंतर्गत आगऱ्याच्या इशापोर रायफल फॅक्टरी तर्फे बनवण्यात आली आहे. जिचं अत्यंत योग्य नाव ठेवलं आहे – “निडर”…!

 

nidar marathipizza 01

स्त्रोत

निडरची काही ठळक वैशिष्ठ्ये

वजन – 250 ग्राम
कॅलिबर – .22 कॅलिबर
एक राऊंड – 8 गोळ्या
किंमत – 35000 रु (अधिकृत परवान्यासोबत)
धातू – अल्युमिनीयम चा मिश्रधातु DTD5124

येथील प्रभारी P K Aggarwal ह्यांनी धातुबद्दल सांगतांना नवीन मिश्रधातु हा वजनाने हलका आणि Titanium सारखाच ताकदीचा असल्यामुळे निडर च्या वजनात कपात करण्यात त्यांना यश आल्याचे नमूद केले.

तसेच रायफल फॅक्टरी इशापोर च्या जनसंपर्क अधिकारी S. S. Naskar ह्यांच्या मते ‘निडर’ ला पर्स, हँडबॅग, जॅकेट्समध्ये सहजपणे घेऊन फिरता येणार आहे.

आता एकट्या घराबाहेर पडणाऱ्या स्त्रिया, पुरुष, महत्वाच्या व्यक्ती परवाना काढून निडर मुळे निडर राहतील.

अर्थात जसं Spiderman सांगतो – “With great power, comes great responsibility”…!

शक्तीसोबत एक जबाबदारी सुद्धा असतेच. ही पिस्तुल बाळगणाऱ्यांनी त्या जबाबदारीचं भान ठेवायला हवं !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?