Site icon InMarathi

स्क्रिनवर दिसणाऱ्या बॉलिवूडमागील लपवलेला, भयानक, काळाकुट्ट इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“ए दिल है मुश्किल जीना यहा जरा हटके जरा बचके ये है बंबई मेरी जान!” मुंबई शहराला ह्या गाण्याच्या ओळीशिवाय आणखी उत्तमरीत्या एक्सप्लेन करता येणं तसं अशक्यच. मुंबई ही खरंच करोडो लोकांची “जान” आहे!

याचं एकमेव कारण म्हणजे मुंबईचं प्रत्येकाला समावून घेणं. जात – पात, धर्म, लिंग, रंग, गरीब – श्रीमंत असा काहीच भेदभाव न करता हे शहर प्रत्येकाला सामावून घेतं

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून माणूस आला तरी त्याला मुंबईत काही ना काही काम मिळतंच!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काम मिळवण्यासाठी करायला लागणार संघर्ष हा खूप मोठा असतो पण त्याचं फळ हे शहर लवकरात लवकर तुमच्या पदरात पाडतं. म्हणूनच तर मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे!

 

 

स्टॉक एक्स्चेंज मधल्या आर्थिक व्यवहारांपासून राज्याचे तसेच देशाचे वेगवेगळे कारभार ह्या मुंबईतूनच होत असतात. पण ह्या सगळ्याबरोबरच मुंबई ही आणखीन एका वाईट गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे ड्रग्स!

असं म्हणतात की गोवा इथे ड्रग्स सर्वात जास्त खप होतो. पंजाबच्या तरुणांची एक संपूर्ण पिढीच ह्या ड्रग्सनी बरबाद केली. पण मुंबई हे ह्या ड्रग्सचं हब मानलं जातं. जिथून देशात तसेच परदेशातून ड्रग्सची ने आण होते.

आणि हे काही आज उलगडलेलं सत्य नाही. ही गोष्ट कित्येक वर्षांपासून आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहिली आहे! मुंबई हे ड्रग माफियाचं केंद्र बनण्यामागचं कारण ते म्हणजे मुंबईला लाभलेला विशाल समुद्र!

मुंबई हे एक बेट आहे. त्यामुळे समुद्री मार्गातून होणारी अंमली पदार्थांची तस्करी आपण बाबा आदमच्या काळापासून बघत आलो आहोत!

जुन्या हिंदी सिनेमात रात्रीच्या काळोखात समुद्र किनाऱ्यावर उतरणाऱ्या होड्या, आणि त्यांना क्लियरन्स देणारे ड्रग माफियाचे क्लीनर आणि मग त्या ड्रग्सचं शहरात येणं हे सगळं आपण पाहिलं आहे!

पण सिनेमात दिसणारं हे चित्र कुठेतरी कुणीतरी पाहिलं असणार त्याशिवाय ते सिनेमात येणं अशक्यच! तर हा असा ड्रग्सचा मुंबईत होणारा शिरकाव आपण सिनेमाच्या माध्यमातून पाहिलेला आहे!

हे ही वाचा –

===

 

 

आणि मुळात ह्या समुद्री मार्गाचा ह्या ड्रग माफिया लोकांनी पुरता फायदा घेतला. प्रत्येक समुद्री प्रवेशद्वारावर सिक्युरिटी तैनात करणं हे जरा अवघडच त्याचा ह्या ड्रग्स लॉर्डना चांगलाच फायदा झाला!

खरंतर इतर वस्तूंची होणारी तस्करी ही मुंबईला नवीन नव्हती. कारण त्यामध्ये कोणाच्याही जीवाशी खेळ नसायचा. पण जसं ह्या अंमली पदार्थांनी हयात उडी घेतली तसं मुंबईचं चित्रच हळू हळू पालटायला सुरुवात झाली!

प्रथम लोकं इंपोर्टेड दारू, सिगरेट, टीव्ही सेट्स, टेपरेकॉर्डर, सोनं चांदी, अशा गोष्टींची तस्करी करत असत. ह्यांची सुद्धा तस्करी का व्हायची कारण त्या काळात सरकारने ह्या गोष्टींवर रोख लावली होती!

पण जसं ड्रग्सच्या तस्करीत मिळणारा अफाट पैसा आणि नफा ह्या स्मगलर्स लोकांना दिसायला लागला तिथून ह्या सगळ्या इतर गोष्टींची तस्करी बंद होऊन फक्त ड्रग्सची ने आण वाढली!

 

 

हळू हळू दाऊद, छोटा शकिल, छोटा राजन अशा कित्येक कुख्यात गुंडांपासून बारीक सारिक प्रत्येक गुंड ह्या ड्रग्स बिझनेस मध्ये सामील होऊ लागला, कारण एकच यातून मिळणार अमाप पैसा!

मुंबई अंडरवर्ल्ड ने आधीच सिस्टिम ला जेरीस आणलं होतं आणि त्यात आता ड्रग्स माफियाची एंट्री झाली होती.

आणि मग कालांतराने अंडरवर्ल्ड आणि ड्रग्स माफिया हे हातात हात घालून काम करू लागले आणि आपल्या सिस्टिमच्या अगदी समांतर चालणारी एक दुनिया निर्माण केली जी आजही पद्धतशीरपणे आपलं काम करत आहे.

क्राइम कव्हर करणारे सुप्रसिद्ध पत्रकार हुसेन झैदी ह्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या रिपोर्टिंग मधून आणि अतिषयक स्फोटक अशी पुस्तकं लिहून ह्या गुन्हेगारी विश्वाचा पर्दाफाश केला. त्यांच्या इतकी स्फोटक माहिती लोकांसमोर आणणारा पत्रकार पुन्हा झालाच नाही!

त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूड मध्ये कित्येक सिनेमे सुद्धा आले. वन्स अपॉन अ टाइम ईन मुंबई हा सिनेमा हाजी मस्तानवर होता, १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटावर अनुराग कश्यपने ब्लॅक फ्रायडे काढला.

 

 

त्यांनी त्यांच्या पुस्तकात फक्त गुन्हेगारी विश्वाची पोलखोल केली असं नाही. तर फिल्म इंडस्ट्री मध्ये वाढणारी अंडरवर्ल्डची दादागिरी, बॉलिवूड माफिया तसेच ह्या सगळ्यात ड्रग्सचा होणार बिझनेस ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा लोकांसमोर आणल्या!

संजय दत्तच्या ड्रग अडिक्शन बद्दल तर सगळ्यांना माहीत आहेच. फरदीन खान ह्याला सुद्धा नारकोटिक्स डिपार्टमेंट ने कोकेन बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती ज्यात तो दोषी होता!

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी ही सुद्धा ड्रग्स बिझनेस मध्ये सामील असल्याचे उघडकीस आलं!

शिवाय आजही बॉलिवूड मध्ये होणाऱ्या ड्रग्स पार्ट्या, अंडरवर्ल्ड शी असलेलं कनेक्शन, पाकिस्तान कडून येणारं फंडिंग, ह्या संगळ्यातून होणारं आतंकवादाचं फंडिंग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडलेल्याच आहेत!

हे ही वाचा –

===

 

 

आणि मुंबई ह्या सगळ्याचं केंद्रस्थान बनलं असून इथली फिल्म इंडस्ट्री ह्या सगळ्या गोष्टींचं एक गोडाऊन बनलं आहे हे आता हळू हळू उघडकीस येत आहे!

आज मुंबईत बसल्या बसल्या तुम्ही कोणतंही हार्डकोर ड्रग्स अगदी सहज घरपोच मागवू शकता हे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत केस मधून सिद्ध झालेलंच आहे!

गांजा, अफीम, कोकेन, हेरोईन, एलएसडी, चरस पासून अत्यंत हाय क्वालिटी ड्रग्स सुद्धा तुम्हाला इथं अगदी सहज उपलब्ध होऊ शकतं. मुंबईत चालणाऱ्या कित्येक पब मध्ये सोशल क्लब मध्ये हे ड्रग्स सर्रास घेतलं जातं!

मुंबईच्या नाईट लाईफचा जितका झगमगाट आपल्याला दिसतो त्यापेक्षा कित्येक पटीने बीभत्स रूप रात्रीच्या वेळेस मुंबईच्या काही परिसरात पाहायला मिळतं!

त्याशिवाय इथं होणाऱ्या रेव्ह पार्ट्या आणि त्यात सामील असणार ड्रग माफिया हे काही आपल्याला नवीन नाही. एकंदरच फिल्म इंडस्ट्री आणि त्यात सामील असलेले हे बेकायदेशीर घटक ह्यामुळे मुंबईत आज ड्रग्सचं इतकं जाळं पसरलं आहे.

पेज ३ आणि फिल्मी पार्ट्यामध्ये होणारं चाइल्ड ट्राफिकिंग, शिवाय लहान मुलांचा होणारं लैंगिक शोषण अशा कित्येक गोष्टी खूप आधीच लोकांसमोर आलेल्या आहेत!

 

 

सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यू संदर्भात जे ड्रग कनेक्शन बाहेर आलं आहे त्यावरून हे समजतं की ड्रग्सची दुनिया कीती खोलवर पसरली आहेत. फक्त फिल्म इंडस्ट्रीच नव्हे तर सगळ्याच शहराला आज ह्या ड्रग्सच्या कॅन्सर ने विळखा घातला आहे.

आणि हे सगळं आत्ताच चालू झालं आहे असंही नाही. वर्षानुवर्षे हे अवैध धंदे चालत आले आहेत आणि आता त्यांनी प्रचंड घातक वळण घेतलं आहे.

आज मुंबईत ड्रग्स पुरवणारी मंडळी ही एका खुन्यापेक्षा कमी नाही. कारण हे लोक लाखो करोडो रुपये लुटून कित्येक लोकांच्या जीवाशीच खेळत आहेत. आणि आता तर हा सगळा बिझनेस इतका पसरला आहे की ते आवरणं हळू हळू कठीण होऊन बसतय!

मुंबई ही कित्येकांच आयुष्य बनवणारी माया नगरी जरी असली. तरी ह्या अशा अवैध उद्योगांना बळी पडून कित्येक तरुणांची आयुष्य उध्वस्त करण्यात भागीदार सुद्धा ही मुंबईच आहे!

ह्यासाठी त्या शहराला दोष देऊन चालणार नाही. कारण जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ड्रग्सचा बिझनेस होतो. पण त्यातूनही या सगळ्यावर निर्बंध आणून ह्याला आळा घालणारे सुद्धा कित्येक देश, राज्यं, शहरं आहेत!

गरज आहे ती योग्य सिस्टिमची, आणि मुळात म्हणजे ड्रग्स ह्या कॅन्सरला मुळासकट उखडून फेकण्याच्या इच्छाशक्तीची! तरच मुंबई ह्यातून थोडी फार सावरू शकेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version