मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कुठल्याही रोग जंतूंना अस्वच्छतेमुळे आपले सृजन करण्या करता अतिशय अनुकूल वातावरण उपलब्ध होते. आणि बहुतेक वेळा आपल्या निष्काळजी पणामुळे आपण ते वातावरण स्वतःहून त्यांना तयार करून देतो.
आता जगात सुरू असलेल्या कोविड -१९ महामारीलाच बघा.
हात वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे, भाजी पाला आणता क्षणीच न वापरता मिठाच्या पाण्याने धुणे, एकदा वापरलेले बाहेरचे कपडे कडक उन्हात किंवा काही तास हवेत वळवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरात कायम स्वचछता बाळगणे,
बाहेरून येणाऱ्या माणसाच्या हातांवर आठवणीने सॅनीटायझर शिडकणे, बाहेर जाताना हातात ग्लवज व तोंडाला मास्क बांधणे, सोशल डीस्टनसिंग पाळणे या प्रकारची काळजी आपण अतिशय आठवणीने, व स्थितीचे गांभीर्य नीट लक्षात घेऊन घेतली.
या कोरोनापासून वाचण्यासाठी कोणतीही लस आपल्याकडे नसताना, “स्वच्छता” ही ढाल बनून आपल्या रक्षणासाठी पुढे आली.
त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं ते यावर इलाज नसल्यामुळे स्वतःला कोरोना पासून वाचवणे किंवा कोरोनाच्या जांतूनाच्या संपर्कात न येणे हा सगळ्यात उत्तम उपाय होता.
आणि त्यासाठी कोरोना जंतू आपल्या शरीरात जिथून प्रवेश करतात तो प्रवेश थांबवणे, अर्थात नाक व तोंड झाकणे आणि डोळ्यांना हात न लावणे हे रामबाण होते. त्यातलाच एक उपाय हा फेस मास्क वापरणे.
आपण सगळेच घरगुती फेस मास्क, सर्जिकल फेसमास्क, वन टाईम युज मास्क अजून बरेच विविध मास्क वापरतो आहोत. पण या जंतूंना लांब ठेवणाऱ्या फेसमास्क बद्दल आपल्याला किती माहिती आहे?
कोणत्या कपड्याने बनलेले फेसमास्क वापरावे, एकदा वापरलेले मास्क पुन्हा वापरावे का, ते मास्क पुन्हा वापरण्याकर्ता डिसइन्फेक्ट कसे करावे याची पूर्ण माहिती आपल्याला आहे का?
नसेल तरी काळजी नसावी, आज आपण तेच पाहणार आहोत. फेस मास्क व ते वापरताना घेण्याची काळजी.
मास्क कसा निवडावा –
कारोना कण हा ०.१२ मायक्रोमिटर एवढ्या आकाराचा असतो. घरगुती मास्क बनवण्याचे कापड हे ८०-५०० मायक्रोमिटर छिद्र असणारे कापड असते. त्यामुळे घरगुती मास्क जरी कमकुवत वाटत असले तरी आपल्याला त्यांची इफिशियन्सी वाढवता येते. खालील उपाय ट्राय करा –
१. t shirt किंवा किचन टॉवेल पासून मास्क बनवा. हे कपडे जाड असतात व इतर कपड्यांच्या तुलनेत यांचे पोअर्स लहान असतात व जंतू, कण यांना इतर कपडा पेक्षा जास्त गाळून घेतात.
२. कापसाच्या २ घड्या करून मास्क शिवा. डबल लेयर्स मुळे पर्टीकल्स जास्त संख्येत गाळले जातात.
३. घरगुती मास्क शिवताना आतून, पेपर टॉवेल चे कोटींग करा. पेपर टॉवेल चे मायक्रोपोअर्स बऱ्याच प्रमाणात सूक्ष्म असतात त्या मुळे हे टॉवेल २३% जास्त कण रोखून धरतात आणि आपल्या सुरक्षेत वाढ होते.
४. मऊ उशीच्या खोळी पासून सुद्धा मास्क बनवता येऊ शकतो.
५. मास्क बनवताना, त्याचे इलॅस्टिक नीट, माप घेऊन घट्ट शिवा. आजूबाजूने हवा जाईल अशी जागा ठेऊ नका. कारण या गॅप मुळे मास्क वापरून सुद्धा नवापरल्या सारखेच होईल.
६. कापडाची दुप्पट घडी केली तर चालेल पण जास्त जाड कापड वापरू नाका. यामुळे श्वास घेण्यास त्रास होईल व श्वास कोंडून अस्थामासारखे आजार होऊ शकतात.
७. शक्यतो नवीन कापडा पासून बनवलेले मास्क वापरा. कापड जुने झाले की धुण्यामुळे व साबणामुळे त्याचे पोअर्स मोठे होतात व मास्क वापरण्याचा काहीच फायदा होत नाही.
मास्क वापरण्याची योग्य पद्धत –
१. मास्क वापरताना त्याचे इलॅस्टिक व्यवस्थित तपासून घ्या. दोऱ्या घट्ट बांधा व सैल इलॅस्टिक असलेले मास्क वापरू नका.
२. मास्क वापरताना हनुवटी, तोंड, नाक व्यवस्थित झाकले जातील याची काळजी घ्या. आजूबाजूने गॅप असायला नको. जेणेकरून कोणताही कण आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाही व बाहेरून आत शिरणार नाही.
३. तुमच्या मस्कला इतर कोणीही स्पर्श करणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. आपण मस्कचा वापर विषाणू रोखण्यासाठी करतो. त्यामुळे मास्क वर बाहेरच्या किंवा अतल्या बाजूने भरपूर धूळ, माती, विषाणू असूशकतात त्या मास्कमुळे संसर्ग होण्याची शक्यता दाट असते.
त्यामुळे दुसरी व्यक्ती आपले मास्क वापरणार नाही व आपण दुसऱ्या व्यक्तीचे मास्क वापरणार नाही याची खबरदारी बाळगा.
४. एकदा वापरलेले मास्क पुन्हा न धुता वापरू नाका. न धुतलेले मास्क वापरून तुम्ही मास्कची इफिशियन्सी कमी करत आहात.
५. मास्कला उलट सुलट करून अजिबात वापरू नका. एकदा वापरलेले मास्क डिसइन्फेक्ट करून मगच वापरा.
६. N९५ मास्क ह्या मास्क ना UVC germicidal irradiation द्वारे किंवा vapor phase hydrogen peroxide याने स्वच्छ करता येऊ शकते. हे शक्य नसल्यास ते मास्क सरळ डीस्कार्ड करा.
७. N९५ रेस्पिरेटर्स हे त्यांच्या एक्सपायरी डेट पेक्षा अधिक काळ वापरता येतात. त्यांची इफिशियन्सी अजिबात कमी होत नाही, त्यामुळे हे मास्क वापरून झाल्यावर ५ – ६ दिवस एयर ड्राय करा. किंवा प्लॅस्टिक बॅग मध्ये गुंडाळून ठेऊंद्या ऑक्सजन न मिळाल्यामुळे विषाणू अजून वाढत नाही व पूर्णपणे नष्ट होतो.
किंवा यांचे कर्टरीजेस अल्कोहोल क्लिनर ने स्वच्छ करून घ्या. ही कर्टरीजेस बदलता पण येऊ शकतात. २ – ३ वेळा अल्कोहोल क्लिनर ने स्वच्छ केलेले कर्टरीजेस बदलून घ्या. तेच वापरणे घातक ठरेल.
८. सर्जीकल मास्क १० – ९०% इफिशियन्ट असू शकतात. पण ते दुसऱ्यांदा वापरू नये. सर्जिकाल मास्क हे N९५ रेस्पिरेटर्स पेक्षा कमकुवत पण घरच्या कापडी मास्क पेक्षा जास्त इफिशियन्ट ठरतात.
हे मास्क पुन्हा वापरायचे असतील तर सार्जिकल मास्क हे कागदी पिशवीत ठेवा व ६-७ दिवस तसेच रहुद्या. या मास्क ना धुणे शक्य नाही कारण फिल्टरिंग क्वालिटी घसरते व प्लॅस्टिक बॅग मधे ठेवल्यामुळे सार्जिकल मास्क वर माईश्चर जमा होते.
९. प्रत्येक वेळी स्वच्छ, धुतलेले मास्क वापरतात हात स्वच्छ धुवून घ्या. ज्यामुळे हातावरचे जंतू, विषाणू मास्कला लागून नाका तोंडत जाणार नाहीत.
मास्क स्वच्छ कसे करावे –
१. मास्क एकदा वापरून झाल्यावर पुन्हा वापरण्याधी गरम पाणी, साबण, किंवा ब्लिचिंग पावडर ने धुवून घ्या. व कडक उन्हात वाळवा. याने ते पूर्णपणे निर्जंतुक होईल.
२. एलास्टोमेरिक रेस्पिरेटर्स ना कधीही अल्कोहोल, लयझोल, ब्लिच किंवा पणी व साबणाने धुणे टाळा. त्या पेक्षा कागदी पिशवीत घालून ६ – ७ दिवस हवेशीर सोडून द्या.
३. N95 किंवा कोणत्याही रेस्पिरेटर्स वर व्हायरस ६ – ७ दिवस सक्रिय असतो व कापडी मास्क वर २ -३ दिवस. त्यामुळे हे रेस्पिरेटर्स प्रत्येक दिवसाला १ वेगळे रेस्पिरेटर येईल असे वापरा.
अर्थात, ७ दिवसांचे ७ वेगवेगळे रेस्पिरेटर. कापडी मास्क ला धुवून वापरणे शक्य असल्यामुळे ते धुवून वापरा.
पुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. वरील काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.