आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सेलिब्रिटी लोकांचं ट्विटर वॉर जनतेला नवीन नाही. काही दिवसांपूर्वी जास्तच गाजलेलं ट्विटर वॉर म्हणजे बॉलिवूड सिने अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मधलं.
सुशांतसिंग राजपूत केस मध्ये उडी मारलेल्या कंगनाने आक्रमक होऊन ट्विटर वर आपलं मत प्रदर्शित करताना वादग्रस्त ट्विट केलं आणि संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिउत्तरामुळे नवीन वाद निर्माण झाला.
९ सप्टेंबरला कंगनाच्या मुंबईत येण्याच्या वादावरून तिच्यावर होणाऱ्या घातपाताची शक्यता बघता केंद्राने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिलेली आहे.
यामुळे वेगळा वाद निर्माण झाला तो वेगळा.पण केंद्राने सुरक्षा दिली यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
मागे गांधी परिवाराच्या सदस्यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतली गेली. तेव्हा सुद्धा हा सरकारी सुरक्षा देण्याचा विषय भरपूर चर्चेत होता.
तर, भारतात कोणत्या आणि किती प्रकारच्या सुरक्षा आहेत आणि ते कोणाला दिले जातात याबाबत सविस्तर पाहूया.
व्हीआयपी आणि प्रतिष्ठित लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्या व्यक्तींना सुरक्षा देते. त्या व्यक्तीला असलेला धोका पाहता ही सुरक्षा दिली जाते.
दुसरीकडे कोणी एखादी व्यक्ती आपल्या जीवाला धोका आहे कारणाने सुरक्षेसाठी आवेदन करू शकते. त्या व्यक्तीला असलेल्या धोक्याची तीव्रता बघता सरकार त्या व्यक्तीला सुरक्षा प्रदान करू शकते.
सुरक्षा प्रदान करण्याची प्रक्रिया :
एकदा का धोक्याची तीव्रता लक्षात आली की राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महानिर्देशक यांची एक समिती गठीत होते आणि कोणत्या प्रकारची सुरक्षा दिली जावी यावर ही समिती निर्णय घेते.
औपचारिक मंजुरीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हा विषय जातो.
केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वाखालील अजून एक समिती आलेल्या रिपोर्टवर ठरवते की कोणत्या प्रकारची सुरक्षा दिली जावी.
सरकारी सुरक्षा यंत्रणेत सहभागी असलेल्या एजन्सीज :
एसपीजी – स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप
एनएसजी – नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स
आयटीबीपी – इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स
सीआयएफएस – सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स
सीआरपीएफ – सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स
या एजन्सीजच्या कमांडोज सोबत स्थानिक पोलिसांच्या तुकडीचा पण यामध्ये सहभाग असतो.
एनएसजी हा देशातील सगळ्यात अत्याधुनिक सुरक्षा बल आहे जो विशिष्ट लोकांना सुरक्षा प्रदान करतो. भारतात आज दिवसेंदिवस विविध क्षेत्रांतून सुरक्षेची मागणी ही वाढत चालली आहे.
ही मागणी लक्षात घेता राजस्थानच्या देवली भागात एका विशेष ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली गेली आहे. तर पाहुयात भारतात दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुरक्षा!
१. एसपीजी :
ही एक अतिविशिष्ट सुरक्षा श्रेणी आहे. फक्त भारताच्या पंतप्रधान आणि त्यांच्या परिवाराला एसपीजी सुरक्षा प्रदान करते.
याआधी माजी पंतप्रधानांना सुद्धा एसपीजी सुरक्षा दिली जायची पण नंतर तिचा काळ ६ महिने करून नंतर झेड प्लस सुरक्षा त्यांना दिली गेली.
या श्रेणीमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या ही गुप्त असते. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना झाली होती.
२. झेड प्लस सिक्युरिटी :
उच्चतम असलेली सुरक्षा श्रेणी. यामध्ये ५५ सुरक्षा बलांची सुरक्षा प्राप्त होत, ज्यात १० एनएसजी कमांडो असतात.
यामधले जवान हे हॅन्ड टू हॅन्ड कॉमबॅट मध्ये सक्षम असतात, ज्यामुळे हत्यार नसताना सुद्धा ते प्रतिकार करू शकतात.
अत्याधुनिक एमपी ५ बंदूक आणि कम्युनिकेशन डिव्हाईस सुद्धा त्यांना दिले गेले आहे.
गरजेनुसार व्यक्तीला बुलेटप्रूफ वेस्ट आणि गाडी तसेच एसकोर्ट कार सुद्धा दिल्या जातात. जॅमर आणि रोड ओपनिंग वाहन सुद्धा झेड सिक्युरिटीच्या काफ़िल्यात दिले गेले आहे.
देशातल्या मोजक्याच व्हीआयपी लोकांना ही सिक्युरिटी दिली गेली आहे.
३. झेड सिक्युरिटी :
यामध्ये २२ सुरक्षा बलांची सुरक्षा प्राप्त होते.ज्यामध्ये ४ ते ५ एनएसजी कमांडो आणि इतर अर्ध सैनिक बलचे जवान किंवा पोलीस असतात.
एक एसकोर्ट गाडी ज्या सोबत दिल्ली पोलीस अथवा आयटीबीएफ किंवा सीआरपीएफ यांचं कवच लाभतं. आजतागायत ३८ लोकांना झेड सिक्युरिटी दिली गेली आहे.
२ ते ८ सुरक्षा रक्षक व्यक्तीच्या आवासला सुरक्षा देतात तर दोन गार्ड्स हे व्यक्ती सोबत कायम असतात. व्यक्ती सोबत एसकोर्ट गाडी पण असते. तसेच त्या व्यक्तीला बुलेट प्रूफ वेस्ट सुद्धा दिली जाते.
३. वाय सिक्युरिटी :
यामध्ये एकूण ११ जवानांची सुरक्षा प्राप्त होते, ज्यामध्ये एक किंवा दोन कमांडोज असतात. तसेच दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर्स पण सोबत असतात.
यामध्ये एका सशस्त्र जवानाची सुरक्षा त्या व्यक्तीच्या घराला दिली जाते.
व्यक्ती सोबत असणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाकडे ९ एमएम ची पिस्तुल तर एकाकडे स्टेन गन असते.
४. एक्स सिक्युरिटी :
सरकारी सुरक्षा यंत्रणे मधली सगळ्यात साधी सुरक्षा. या सुरक्षा व्यवस्थेमध्ये केवळ दोन सुरक्षा बलांची सुरक्षा त्या व्यक्तीला प्राप्त होते. ज्यामध्ये फक्त एकाकडे हत्यार असते.
ही सुरक्षा यंत्रणा काम कशी करते? तर, एखाद्या व्यक्तीला झेड प्लस सुरक्षा दिली गेली आहे तर पूर्ण देशात त्याला ती सुविधा प्राप्त होते. त्यासाठी एक कार्य प्रणाली आहे.
जस की वर सांगितले की त्या व्यक्तीला एनएसजी किंवा इतर प्रोटेक्शन ग्रुपचं कवच मिळत, जेव्हा ती व्यक्ती आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाते तेव्हा त्यातले काही मोजकेच जवान त्या व्यक्ती सोबत जातात.
बाकी जबाबदारी त्या राज्याची असते ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला आपल्या प्रवासाची आणि भेटीची सूचना त्या राज्याला द्यावी लागते.
सुरक्षेच्या या व्यवस्थेबाबत अजिबात कुठे उल्लेख केला जात नाही.
गांधी परिवाराला एसपीजी सुरक्षा दिली गेली होती. पण खासगी प्रवासाच्या वेळेस ते कोणतीही माहिती गृह मंत्रालयाला न देता प्रवास आणि परदेशवारी करत असे शिवाय एसपीजीची सुरक्षा ते सोबत नेत नसे.
त्यामुळे सुरक्षेप्रति त्यांची असलेली वागणूक पाहता त्यांना एसपीजी वरून झेड प्लस सिक्युरिटी वर डीग्रेड करण्यात आले.
तर, या आहेत भारतात सरकारी यंत्रणे कडून मिळणाऱ्या सुरक्षेचे प्रकार.
आणि हो जर तुम्ही वैयक्तिक सुरक्षेसाठी जर सरकारकडे सुरक्षा मगितली असेल तर तुम्हाला प्रति महिना त्याचा चार्ज सुद्धा भरावा लागतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.