Site icon InMarathi

ह्या देशात रस्त्यांवर गाडी चालवताना मिळतं एक “सुरेल” सरप्राईज!

znmd inmarathi 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

 

रस्त्यावरुन चालताना, प्रवास करताना आपण अनेकदा विविध आवाज ऐकतो. आपल्या देशात बहुतांश वेळी हे आवाज कर्णकर्कश्य भोंग्यांचेच असतात.

विशेषत: सिग्नलवर किंवा ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले असताना सतत जोरजोरात हॉर्न वाजवायची वाईट सवयच लागलेली असते.

ओव्हरटेक करताना हायवे वर जोरजोरात हॉर्न वाजवणे म्हणजे भुषणावह काम केल्याचा फिल येतो असेही काहींना वाटते.. असो!

तुम्ही कधी मेलोडी रस्ते ऐकले आहेत का? जरा वेगळं वाटलं ना? पण हे खरंय. महामार्गांवरुन प्रवास करताना जर तुम्हाला काही विशिष्ठ कारणांनी कर्णमधूर संगीत ऐकायला मिळालं तर! आता तुम्ही इथे गल्लत करू नका.

 

 

म्हणजे प्रवासादरम्यान आपल्या कारमध्ये किंवा बसमध्ये जे आपण गाणं लावतो त्या संगीताबद्दल नाही बोलत आहोत तर. तुमच्या वाहनाच्या वेगमर्यादेप्रमाणे रस्तेच खुद्द तुम्हाला संगीत ऐकवतात… हे कसं?

म्हणजे पहा एका ठराविक वेगमर्यादेत तुम्ही प्रवास करत असाल तर एक सुंदर सुमधूर संगीत ऐकत तुमचा छान प्रवास होईल. जर मध्येच तुम्ही वेग वाढवला तर संगीत थोडं बेसुरं होईल.

मग जर तुम्ही वेग कमी केलात किंवा नियंत्रीत केलात तर परत अत्यंत मधूर आणि नादमय, विशिष्ठ लयीत काही सुरावटी तुम्ही ऐकू शकता. जरा विचित्र वाटतंय ना. पण हे असं शक्य आहे. भारतात नव्हे काही परदेशांमध्ये.

आपण यासाठी दि ग्रेट जपानचं उदाहरण पाहू. हाय-वे वरुन फुल्ल स्पिडमध्ये मस्त ढिनचॅक गाणी वाजवत, मनमुराद आनंद घेत धम्माल प्रवास करणं कोणाला नाही आवडणार? सगळ्यांनाच ते आवडतं.

विशेषत जपान्यांना तर संगिताची विशेष आवड. पण करमणुकीसोबतच त्यांनी एक शक्कल लढवली आहे.

तुम्ही जर कधी जपानमध्ये हाय-वे वरुन प्रवास करत असाल तर रस्त्यावर कान ठेवा. अर्थात आधी समोर नजर ठेवा अन्यथा अँक्सिडेन्ट होईल!

 

 

पण तुमच्या वेगमर्यादेवर लक्ष ठेवून त्याप्रमाणे ऐकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला रस्त्यावरुन मंद, मधूर संगीत किंवा धून ऐकू येईल. आता हे कसे शक्य होते ते पाहुया.

रस्त्यांवरील खोबणींची विशिष्ठ बांधणी :

जपानी लोक रस्ते डिझाईन करताना पृष्ठभागावर विशेष अंतराने लांबी आणि रुंदी दोन्हींचा मेळ साधत काही खोबा तयार करतात. त्याला खोबणी किंवा खाचे असेही म्हणतात.

ज्यावरुन वाहन जात असताना त्याचे टायर घासले जातात आणि विशिष्ठ कंपनं निर्माण होतात. ही कंपनं एका ठराविक मर्यादेने तयार होत असतात.

जसे जसे खोबणींमध्ये टायरचे घर्षण होते तसतशी कंपनं निर्माण होतात आणि त्या विशिष्ठ साखळीमुळे आपल्याला संगिताची धून ऐकल्याचा भास होतो.

या खोबणी तयार करणे हेच खरे स्किल आहे. त्यांची खोली, लांबी, रुंदी, आकार आणि दोन खोबांमधील ठराविक अंतर याचा योग्य विचार केलेला असतो त्यातूनच योग्य ती ध्वनी कंपनं निर्माण होतात.

याचे अन्य काही वापर :

केवळ करमणूक म्हणून नव्हे तर तुम्ही चुकीच्या वेग मर्यादेने वाहन चालवत असाल तर तशी कंपने तुम्हाला ऐकू येतात कारण तिथे तशा ध्वनी लहरी तयार होतील अशा खोबणी केलेल्या असतात. याचा अर्थ तुम्ही वेग नियंत्रीत करावा असा आहे.

 

 

जर तुमचे वाहन ठरलेली लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये जात असेल तर तेथील खोबणींमध्ये जे टायरचे घर्षण होते त्यातून चालकाला समजते की आपली लेन चुकते आहे.

जर तुम्ही निर्धारित वेगमर्यादेत वाहन चालवत असाल तर तुम्ही सुरक्षित असून तुमची गती स्थीर आहे हे दर्शवणाऱ्या आणि चालकाला प्रोत्साहित करणाऱ्या नादमधूर मेलडीज ऐकू येतात.

थकलेल्या ड्रायव्हर्सना जागरूक करणे, त्यांना वाहन थांबवण्यास सांगणे आणि सुरक्षित लेनमध्ये उभे करणे त्यासोबतच कार अपघातांचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश देखील या सांगितीक खोबणी तयार करण्यामागे आहे.

जपानमध्ये फुजीयामा पर्वताकडे जाणाऱ्या हाय-वे वर तसेच राष्ट्रीय महामार्ग २५२ ज्याला कंट्री रोड असेही म्हणतात यावर अनेक मेलडी रस्ते आहेत. असे आणखी कोणते देश आहेत?

डेन्मार्क :

 

 

१९९५ साली डेन्मार्क या देशाने रोड अँज अँन इन्स्ट्रुमेेंट ही संकल्पना राबवली. रस्त्यांचे डांबरीकरण करतानाच विशिष्ठ जागांवर म्हणजे मध्यभागी आणि दोन्ही कडांना विशिष्ठ अशा पांढऱ्या बॉट्सच्या ठिपक्यांची मांडणी केली आहे.

ज्याला ठराविक उंची आणि गोलवा असतो जेणेकरुन त्यावरुन टायरचे घर्षण होत असताना नादमय आवाज येतो.

डेन्मार्क हा देश फुटबॉल खेळणारा असल्याने पांढरा रंग आणि बॉलचा आकार गोल म्हणून लहानशा गोल ठिपक्यांची रचना केली आहे.

 

न्यू मेक्सिको :

 

 

न्यू मेक्सिकोमधील परिवहन अधिकाऱ्यांना अशी अपेक्षा आहे की, अल्बुकर्क आणि तिजेरास दरम्यान जो ऐतिहासिक रस्ता म्हणून ओळखला जातो ज्याला रूट ६६ म्हणूनही ओळखतात.

त्या मार्गावरुन प्रवास करताना जर रस्त्याचे संगीत ऐकायचे असेल तर वाहनालकांनी दिलेल्या मर्यादेचे अतिशय कडक शिस्तीत पालन करणे गरजेचे आहे.

४५ मैल प्रति तास या वेगाने जर प्रवास सुरू ठेवला तरच या महामार्गावर तुम्ही मेलडी रस्त्याचा आनंद घेऊ शकता. मात्र वेगमर्यादा थोडी जरी कमी-जास्त झाली तर, तुम्हाला संगीत ऐकू येणार नाही.

 

कॅलिफोर्निया, America :

 

 

येथील लँकेस्टरमध्ये अमेरिकेतील एकमेव मेलडी रोड किंवा सांगितीक रस्ता सापडतो जिथे प्रसिद्ध “विल्यम टेल ओव्हरचर” ची एक झलक ऐकायला मिळते.

अर्थात त्यासाठी तुमची वेगमर्यादा केवळ ५५ मैल प्रति तास असली पाहिजे. त्यापेक्षा कमी अथवा जास्त नाही. सुरुवातीला या सांगितीक खोबण्या येथील निवासी क्षेत्रातच बांधल्या.

मात्र सततच्या आवाजानी येथील रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्याने अखेर या सांगितीक खोबणी तेथून काढल्या आणि औद्योगिक क्षेत्राजवळ पुनर्पस्थापित करण्यात आल्या.

 

दक्षिण कोरिया :

 

 

इथे जवळपास ७० टक्के रस्ते अपघात हे लक्ष विचलित झालेल्या किंवा झोपाळलेल्या चालकांमुळे घडतात.

म्हणून कोरियन हाय-वे कॉर्पोरेशनने वाहनचालकांचे लक्ष विचलित न होण्यासाठी मुख्य मार्गांच्या दोन्ही कडेला विशेष वाद्य पट्ट्या किंवा सांगितीक ध्वनी निर्माण होईल असे खाचे बसवले आहेत. ज्यामुळे चालक अलर्ट राहतो.

तर तुम्हाला मेलडी रोडबद्दल वाचून कसे वाटले? आणि तुमची इच्छा होतेय का अशा रस्त्यांवरुन प्रवास करण्याची.. ते नक्की आम्हाला तुमच्या कमेंटमधून कळवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version