Site icon InMarathi

ज्ञानगंज : मृत्यूवर विजय मिळवणाऱ्यांची हिमालयातील रहस्यमय भूमी!

himalay shali ghram inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अमरत्व, मृत्युंजय या कल्पना आजच्या नवीन युगाला पटणाऱ्या नाहीत.

आपल्या मते त्या केवळ पिढ्यान दर पिढ्या सांगण्यात आलेल्या काही भ्रामक समजुती आहेत. त्यामुळे जर आपल्याला कोणी सांगितलं की हिमालयामध्ये एक असं ठिकाण आहे जेथे जाणारा माणूस हा मृत्यूवर विजय मिळवू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या मानवी इच्छा-आकांक्षापासून अलिप्त राहू शकतो, तर या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण!

पण आजही या गोष्टीवर विश्वास ठेवणारे लोक सापडतील जे म्हणतात हिमालयामध्ये एक अमरत्व प्राप्त करण्याचं ठिकाण आहे ज्याला ‘ज्ञानगंज’ म्हणून ओळखलं जातं.

 

स्रोत

 

प्राचीन ग्रंथांच्या म्हणण्यानुसार, ज्ञानगंज हे हिमालयामधील एक अतिप्राचीन ठिकाण आहे, जेथे माणूस अध्यात्माची चरणसीमा प्राप्त करतो आणि अमर होतो.

असं म्हणतात की हे ठिकाण हिमालयामध्ये तिबेटच्या भागात कुठेतरी वसलेलं आहे. त्याचा नेमका ठाव ठिकाणा कोणाला माहित नाही. हे ठिकाण उर्वरित जगापासून पूर्णपणे अलिप्त असल्याचा दावा केला जातो.

या जागेला शांग्री-ला, सिद्धाश्रम किंवा शंभाला म्हणून देखील ओळखले जाते. ज्ञानगंजवर विश्वास ठेवणारे म्हणतात की जोवर तुमच्या नशिबात नाही तोवर तुम्ही येथे पोचू शकणार नाही.

जेव्हा वेळ येईल तेव्हाच तुमचे भाग्य तुम्हाला या ठिकाणी आणून सोडेल. तसेच अगदी सच्च्या मनाने या जागेचा ध्यास घेतला तरच ज्ञानगंजचे दर्शन होते.

 

 

बुद्ध धर्मातील काही उल्लेखांनुसार, भगवान बुद्धांनी कालचक्र देवाचे स्वरूप जाणले होते आणि दक्षिण भारतातील आपल्या अनुयायांना त्या संबंधित उपदेश केला. त्यांच्या त्या अनुयायांमध्ये राजा सुचंद्र देखील होता. त्याने त्यांची सर्व प्रवचने लिहून काढली आणि ती घेऊन तो त्याचे राज्य शंभाला येथे परत आला. भगवान बुद्धांच्या त्याच उपदेशांचे पालन येथे केले जाते.

तिबेटी बुध्द धर्मानुसार हे रहस्यमयी ठिकाण मध्य आशियामधील एका अंधुक ठिकाणी वसलेलं आहे. जे डोळ्यांनी पाहणं कठीण!

तिबेटी प्राचीन कथांमध्ये यासंदर्भात अजून एक अविश्वसनीय गोष्ट आढळते ती म्हणजे जेव्हा जगावर भयंकर मोठे संकट कोसळेल तेव्हा शंभाला राज्याचा २५ व सम्राट प्रकट होईल आणि आपल्या पृथ्वीला एका दुसऱ्या नव्या युगात घेऊन जाईल.

 

स्रोत

 

काही प्राचीन बुद्ध लिखाणामध्ये ज्ञानगंज कसे शोधून काढावे याची अगदीच अपुरी पण महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते ज्या माणसाला साक्षात्कार झाला आहे तो माणूस येथे सहज पोचू शकतो.

ज्ञानगंजबद्दल अजून एक चक्रावणारी गोष्ट म्हणजे सॅटेलाईट आणि इतर तंत्रज्ञानयुक्त डिव्हाईसमध्ये ज्ञानगंज शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्यातही या जागेचा काही मागमूस सापडला नाही.

असे म्हटले जाते की ज्ञानगंज हे पूर्व व पश्चिम विचाधारेचे पालन करत नसून त्याची स्वत:ची अशी स्वतंत्र विचारधारा आहे. येथे राहणाऱ्या कोणाही माणसाचा कधीही मृत्यू होत नाही.

 

स्रोत

 

अर्थात या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण अश्या रहस्यमयी गोष्टी काही वेळासाठी का होईना पण डोकं मात्र नक्कीच चक्रावून सोडतात, हो की नाही?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version