हाय-हिल्स स्त्रियांसाठी नव्हे, तर पुरुषांसाठी बनवल्या होत्या, विश्वास बसत नाहीये? हे वाचा…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“फॅशन का है ये जलवा” असं म्हणत रँपवर कॅटवाॅक करत चालणाऱ्या माॅडेल्स बघताना भान हरपतं. पेन्सिल हिल्स घालून या माॅडेल्स चालतात कशा हा एक मोठा प्रश्नच पडतो.
फॅशन शो मध्ये इतक्या सराईतपणे उंच टाचेच्या चपला घालून, आपला तोल सांभाळत कशा काय या इतकं दिमाखदार चालू शकतात?
चपलांचे पण किती प्रकार असतात…स्लीपर, सपाता, सँडल्स, पावसाळ्यात वापरायचे चप्पल, करकर वाजणारे चामड्याचे चप्पल, बाॅक्स हिल्सचे चप्पल, पाॅईंटेड हिल्सवाले चप्पल, पेन्सिल हिल्सवाले चप्पल, मोजड्या, बूट, स्पोर्ट्स शूज, कॅनव्हास शूज, हाय हिल शूज!!!
कार्यक्रमासाठी नक्षीदार असलेले फंक्शनल चप्पल…काय त्याचं कौतुक… त्यावर केलेले जरदोसी वर्क, खडे, कुंदन वगैरेंनी त्याचा केलेला नट्टापट्टा.. बघा म्हणजे आपण चप्पल पण स्टायलिश करुन टाकली.. डिझायनर चप्पल!!!
आता हाय हिल्स चप्पल फक्त मुली, स्त्रीया वापरतात, पण तुम्हाला हे माहित आहे का, हे हाय हिल्स चप्पल प्रथम पुरुषांसाठी बनवले होते.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कशी वाटते आहे कल्पना? पुरुष हाय हिल शूज घालून टाॅक टाॅक चालत जात आहेत..हसू येतंय ना? पण ही गोष्ट खरी आहे, की हाय हिल शूज हे पुरुषांसाठीच बनवले होते.
ट्रेकींग करताना, ड्रायव्हिंग करताना हे शूज त्रासदायक ठरतात. ज्या महिला हे हाय हिल्स चप्पल वापरतात त्यांना गवतावरुन चालताना, बर्फावरुन चालताना हे शूज काढायला सांगितले जाते.
कच्च्या दगड धोंडे असलेल्या रस्त्यावर तर हे हाय हिल्स बिनकामाचेच असतात, कारण त्या हाय हिल्स अडकून पडण्याच्या, पाय मुरगळायचा धोका असतो.
हे हाय हिल्स चप्पल कुठेही वापरता येत नाहीत, त्यात तो आराम नाही जो साधे चप्पल किंवा बूट वापरताना असतो.
या हिल्सवाल्या चप्पल फक्त गुळगुळीत रस्ते आणि चकचकीत फरशांवरच वापरण्यायोग्य आहेत. कारण मुळातच ते बनवताना चालण्याच्या हेतूने बनवलेच नव्हते.
हे हाय हिल्स चप्पल मुळात बनवले होते ते घोडदळातील सैनिकांसाठी. म्हणजे रिकीबीत त्या उंच टाचांमुळे त्याचे पाय अडकून रहावेत असा हेतू त्यामागे होता.
त्याकाळी बंदुका नाही, तर धनुष्यबाण वापरलं जायचं. मग खोगिरावर बसलेला सैनिक रिकीबीत पाय घट्ट रोवून शत्रूवर बाणांचा वर्षाव करायला सज्ज व्हायचा.
रिकीबीत पाय घट्ट रोवायला ती उंच टाच मदत करायची. त्यामुळे घोड्यावरुन पडायचा धोका कमी व्हायचा. सैनिकांसाठी हा पर्याय उत्तमच होता.
उत्तम घोडेस्वाराचं हे लक्षण मानलं जायचं की, तो घोड्यावर बसूनच नाही तर घोड्यावर उभा राहूनही युद्ध करु शकतो. त्यासाठी रिकीबीत पाय रेटून उभं रहायला हा उंच टाचांचा बूट अतिशय उपयोगी होता.
पूर्वीच्या काळात राजे- महाराजे चतुरंग सेना बाळगत. त्यात घोडदळाचं महत्त्व होतंच होतं. ते खूप मोठं घोडदळ युद्धासाठी पदरी बाळगत.
शिवाजी महाराजांचं याचसाठी हयपती म्हणजे घोड्यांचा स्वामी असं वर्णन जाणता राजाच्या श्लोकात केलेलं आहे.
–
- टाच-दुखीच्या असह्य वेदना तुम्हालाही होतात? वाचा त्यामागची कारणे आणि उपाय..!
- बापरे! या गावातील सगळेजण आहेत बुटके, वाचा एक न उलगडलेलं रहस्य…
–
१६ व्या शतकात पर्शियाचा राजा शाह अब्बास पहिला याचं घोडदळ हे जगातील सुसज्ज आणि अतिशय मोठं समजलं जायचं. पाश्चिमात्य देशांत त्यानं संधी करण्यासाठी आपला दूत पाठवला होता.
त्यावेळी पाश्चिमात्य लोकांना त्यांचे उंच टाचांचे बूट पहायला मिळाले. ते काही पेन्सिल हिल्स नव्हते. साधारण टाचेपेक्षा थोडीशी उंच केलेली टाच त्या बुटांना होती.
पर्शियातून आलेली ही उंच टाचांच्या चपलांची फॅशन युरोपमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली. जे खानदानी अमीर उमराव होते ते जाणीवपूर्वक हाय हिल्स चप्पल वापरत.
उंच टाचांचं चप्पल हे त्यांच्या उच्च कुलीन असल्याचं लक्षण मानलं जाई आणि इतर वर्गातले पुरुष लोक सपाट टाचेचे चप्पल वापरत. त्यावरुन कोण घरंदाज आहे ते समजायचं.
साधारण जनता आणि उच्च कुलीन लोकांतील फरक ही हाय हिल्स चप्पल अधोरेखित करायची.
बुटक्या लोकांना आपल्या बुटकेपणाचा न्यूनगंड असतो खूपदा. अगदी राजे महाराजेही त्याला अपवाद नव्हते.
फ्रान्सचा राजा १४ वा लुई याची उंची फक्त पाच फूट ४इंच होती. ती जास्त दिसायला हवी यासाठी तो ४ इंच १० सेमी हाय हिल बूट वापरायचा.
राजाचा बूट तो… त्यावरही नक्षीकाम, लाल रंगाची उंच टाच आणि लाल रंगाचं सोल त्याच्या बुटाला होतं. मग त्यानं दरबारातील त्याच्या मंत्र्यांनाही असे उंच टाचेचे बूट सक्तीचे केले.
पुढे तो उच्च कुलीन लोकांचा एक मापदंडच झाला. हळूहळू तो रंग, ती पद्धत इतरांनीही अंमलात आणली.
अमीर उमरावांच्या बायकाही हिल्स वापरु लागल्या आणि ही उंच टाचांच्या चपलांची फॅशन महिला वर्गात आली रुजली ती कायमचीच. ती आजवर कुणी मोडीत काढू शकलेलं नाही.
अमीर उमरावांच्या बायका, तर उंच टाचांच्या चपला वापरत. त्यांच्या मोलकरणी, दासी आणि या मालकीणी यांच्या टाचेच्या उंचीत फरक असायचा.
मालकीणबाईंची टाच जास्त उंच असायची आणि त्या आपली टाचही दिसू नये यासाठी घोळदार झगे घालत.
नंतर चीनने त्यात काही बदल करत पेन्सिल हिल्स आणल्या. त्या वापरणं तसं त्रासदायकच होतं. इतक्या निमुळत्या टाचेवर संपूर्ण शरीराचा भार टाकून तोल सांभाळत चालणं हे अतिशय अवघड काम आहे.
जगातील सर्वात प्राचीन बुट वापरणारी मुलगी म्हणजे सिंड्रेला! प्रत्येक देशात तिची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते, पण त्या बुटांची फॅशन पुरुषांमुळे आली आणि स्त्रियांनी ती कायमस्वरूपी आपलीशी केली हे सत्य कधीही नाकारता येणार नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.