Site icon InMarathi

दुबईच्या आकाशात उडणार फ्लाईंग टॅक्सी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या फारच वाढली आहे. पाच मिनिटे देखील गाडी बाहेर काढली नाही की लगेच ट्राफिक सुरु होतं. अश्याच प्रकारच्या ट्राफिक समस्येने त्रस्त असणाऱ्या दुबईने या  समस्येला आळा घालण्यासाठी एक अजबचं चमत्कार करून दाखवला आहे. अहो त्यांनी चक्क हवेत उडणारी फ्लाईंग टॅक्सी बनवली आहे.

स्रोत

या फ्लाईंग टॅक्सीची विशेष गोष्ट ही आहे की आता बसणारा प्रवासी स्वत: ही टॅक्सी उडवू शकणार आहे. या फ्लाईंग टॅक्सीच्या माध्यमातून एका तासात १०० किमी पर्यंतचे अंतर कापले जाऊ शकते. फक्त अर्ध्या तासाच्या चार्जिंगसह ही फ्लाईंग टॅक्सी ५० किमी पर्यंत उडू शकते.

स्रोत

या आधुनिक फ्लाईंग टॅक्सीची निर्माती आहे चीनची EHANG कंपनी! या फ्लाईंग टॅक्सीच नाव देखील आहे ‘EHANG 184’
वाहतुकीच्या दुनियेमध्ये हे नवं तंत्रज्ञान अगदी धुमाकूळ घालतं आहे. या फ्लाईंग टॅक्सीमध्ये केवळ एक सीट असून तिला उडवण्यासाठी कोणत्याही स्पेशल ट्रेनिंगची गरज नाही.

स्रोत

फ्लाईंग टॅक्सीमध्ये बसल्यावर प्रवाश्याला केवळ ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणचं नाव टाकायचं आहे. आणि फ्लाईंग टॅक्सी सुरु करायची आह्रे. ही फ्लाईंग टॅक्सी जमीन उतरवणे देखील अतिशय सोपे असून प्रवाश्याला फ्लाईंग टॅक्सी हाताळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

स्रोत

यंदाच्या जुलै महिन्यापासून ही फ्लाईंग टॅक्सी दुबईच्या आकाशात उडताना दिसेल अशी आशा आहे. सोबतच २०३० सालापर्यंत दुबईमध्ये सेल्फ ड्राइविंग ट्रांसपोर्ट सिस्टम उभारण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version