Site icon InMarathi

भारतीय व्यापाऱ्यानेच वास्को दा गामाला भारताचा सागरी मार्ग दाखवला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पाश्चिमात्य लोकांना “भारत सापडणं” ही त्यांच्यासाठी अपूर्व घटना होती. त्यांच्यासाठी हा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे मोठाच शोध होता. अर्थात, त्यांच्यासाठी जरी तो “शोध” असेल तर आपल्यासाठी हे कित्येक हजार वर्षांपासून आपलं घरच होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा ‘शोध’ असला तरी आपल्यासाठी फक्त ‘आणखी एक पाहुणा’ एवढंच ह्याचं महत्व. असो, मुद्दा हा की आपण सर्वांनीच शाळेत “भारताला कुणी शोधलं?” ह्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात “वास्को दा गामा” असं दिलंय. आपण इतिहासात तेच शिकलोय.

सन १४९७ मध्ये जेव्हा वास्को दा गामा भारतात आला तेव्हा “भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन” म्हणून इतिहासाने त्याची नोंद घेतली. पण त्याला भारताचा सागरी मार्ग दाखवणारा एक भारतीय व्यापारीच होता – ही नोंद इतिहासाने फारशी ठळकपणे घेतली नाहीये. हे आश्चर्यकारक आहे कारण – स्वतः वास्कोच्या रोजनिशीमधेच ही नोंद आहे…!

 

 

प्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वास्को दा गामाची रोजीनिशी वाचली तेव्हा त्यांना ही नोंद वाचून सुखद धक्काच बसला.

आपल्या रोजनिशीमध्ये सोन्याचा धूर निघणाऱ्या भारताचा शोध का घ्यावासा वाटला, त्याची तयारी कशी केली आणि प्रवास प्रयाण कसं झालं…ह्या सगळ्या नोंदी वास्कोने करून ठेवल्या आहेत.

आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळ एक प्रचंड जहाज बघून वास्को आश्चर्यचकित झाला. चौकशी करण्यासाठी आपल्या नोकराला त्याने ह्या भल्या मोठ्या जहाजावर पाठवलं. परतल्यावर नोकराने ‘हे भारतीय व्यापाऱ्याचं जहाज आहे’ हे सांगितलं आणि हरखून जाऊन वास्को स्वतः त्या जहाजावर गेल्या.

 

 

“मला भारत शोधायचा आहे” असं म्हटल्यावर गडगडाटी हास्य करत तो ढेरपोट्या व्यापारी म्हणाला :

अरे, तू काय भारत शोधणार? आमच्या अनेक पिढ्या मसाल्याच्या पदार्थाच्या विक्रीसाठी भारतातून इथे येतात. दोन दिवसांत माल संपतो व आम्ही परत जातो. दोन दिवस थांब, आमच्या मागोमाग ये.

वास्कोने तेच केलं. व्यापाऱ्यासोबतच राहून त्याचा आफ्रिकेतला व्यापार बघितला आणि दोन दिवसांनी व्यापाऱ्याच्या जहाजामागे आपलं जहाज लावलं !

अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रसिद्ध गुजराती व्यापारी कांजी मलम हाच वास्को दा गामाचा सागरी वाटाड्या होता. वास्कोला आफ्रिकेच्या मालंदी बंदरापासून कालिकत (कोझिकोडे, केरळ) बंदरावर कांजी मलमनेचं आणलं असं म्हटलं जातं.

 

असो – कांजी मलम की आणखी कुणी – डॉ. हरिभाऊ वाकणकर ह्यांच्यानुसार वास्कोला भारतात आणणारा भारतीय व्यापारीच होता, हे मात्र नक्की !

Image source

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version